Header Ads Widget

मुख्यमंत्र्याच्या खासदार पुत्राचा हादगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात जंगी स्वागत


विशेष प्रतिनिधी : नागोराव शिंदे   :- 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डॉ श्रीकांत एकनाथराव शिंदे यांचे हादगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आलेट असल्याची माहिती आमचे नायगाव फास्ट न्यूजचे तालुका प्रतिनिधी नागोराव शिंदे यांनी दिली आहे 

शिवसेनेचे युवा नेते खासदार श्रीकांत एकनाथराव शिंदे यांनी दिनांक २७ मे २०२३ रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत त्यांच्या हस्ते विविध कामाचे भूमिपूजन सोहळ्याचे कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते नांदेड जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या हातगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील पुढारी आणि त्याचे फटाक्याची आतिषबाजी करून जोरदार स्वागत केले आहे 

हदगाव तालुक्यात डॉ. श्रीकांत एकनाथराव शिंदे यांचा आगमन होताच हादगाव हिमायतनगर विधानसभेचे लोकनेते बाबुराव कदम यांच्यासह इतर मान्यवरांनी शिंदे यांचा जंगी स्वागत करण्यात आले आहे

यावेळी शिवसेना उपनेते खा.हेमंत पाटील, मा.शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर, युवासेना जिल्हाप्रमुख संदेश पाटील हडसणीकर, युवासेना तालुका प्रमुख सरपंच ॲड.बाळा पतंगे खैरगावकर, राजू पाटील,शेलोडेकर  संतोष पाटील, ज्ञानेश्वर पुट्टेवाड, गजानन हरडपकर उपस्थित होते


Post a Comment

0 Comments