Header Ads Widget

अर्धापूर जाणाऱ्या बायपास तामसा रोडच्या टी पॉईंट जवळ ट्रॅक्टरची ट्राॅली पल्टी एक ठार दुसरा गंबीर जखमी


माधव पवार / नागोराव शिंदे /-:-

नांदेड जिल्ह्याच्या आर्धापूर तालुक्यातील बायपास जाणाऱ्या तमासा रोड वरील टी पॉईंट जवळ दिनांक २८ मे २०२३ रोजी वीट भरून घेऊन जाणारी ट्रॅक्टरची ट्राॅली पल्टी खाली झाल्यामुळे या झालेल्या अपघातात एक जन ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला असल्यामुळे महा मार्गपोलीस केंद्राच्या मदतीने अर्धापूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे 

जिल्ह्यातील अर्धापूर बायपास जाणाऱ्या रोडवर तामसा टी पाॅईट ब्रिज जवळ ट्रॅक्टर ट्राॅली पल्टी होऊन अपघात झाल्याची माहिती मिळाल्याने महामार्ग पोलीससांनी अति दक्षता मानल्या जाणाऱ्या अंबूलन्सला पाचरण करून पो काॅ १४४८पोलीस नाईक कदम २५४९ डवरे   पी सी २९२८ कदम यांना रवाना करण्यात आले आहे

महामार्ग पोलीस केंद्र यांनी सदरील घटनेची पाहणी केली असता वीट भरलेली सदरची ट्रॅक्टर व ट्राॅली ही पल्टी झाल्याने दोन जन ट्रॅक्टर ट्रॉली खाली दबलेले दिसल्याचे दिसून आले त्यांना बाहेर काढण्यासाठी पोलीसानी मोठे प्रयत्न केले पुढील उपचारासाठी ग्रामीण अर्धापूर  येथे घेऊन गेले असता येथील वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्यांना तपासले असता अशोक विश्वनाथ जाधव वय ४० वर्ष हा मरण पावल्याचे सांगितले आहे

याच अपघातातील दुसरा गंभीर जखमी असलेला उद्धव किशनराव गवळी वय २६ वर्ष यास प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी डेल्टा हॉस्पिटल नांदेड येथे दाखल करण्यात आले आहे

सदरच्या अपघाताची माहिती मिळते सदरचे हे दोघे राहणार जैतापूर तालुका जिल्हा नांदेड तसेच अपघातग्रस्त वाहन हे रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली आहे 


Post a Comment

0 Comments