माधव पवार
मुदखेड तालुक्यातील व मुदखेड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे चिलपिंपरी येथे दिनांक ११ मे २०२३ दुपारी ३ ते साडे तीन वाजण्याच्या दरम्यान एका घरावर बांधकाम करत असताना लोखंडी गजाळ्याचे कालम उभे करते घराजवळून गेलेल्या विद्युत प्रवाहाच्या ताराला सदरची गजाळी लागून दोन मिस्त्री यांचा जागी मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला असल्याचे माहिती उपोनि बालाजी गिते यांनी नायगाव फास्ट न्यूजला दिली आहे
तालुक्यातील चिलपिंपरी येथील रहिवासी असलेले हरी रघुनाथ गाडे यांच्या घरांचे बांधकाम चालू असल्यामुळे याच गावातील मिस्त्री या घरावर काम करत होते परंतु घराजवळून गेलेल्या विद्युत प्रवाहाला लोखंडी गजाळ्यांचे काल उभे करत असताना अचानक विद्युत प्रवाह उतररू दोन मिस्त्री जागीच ठार झाले तर दुसरा एक जण गंभीर जखमी झाला असल्याचे पोलिसांनी माहिती दिली आहे
चिलपिंपरी येथील रहिवासी असलेले पुंडाजी बाबाराव गाडे वय २५ वर्षा संभाजी आनंदा गाडे २४ वर्षी यांनी घरावर बांधकाम करीत व पिलर उभे करत असताना जागीच ठार झाला तर गंभीर जखमी केशव भागवत गाडे ३० वर्ष सर्व राहणार चिलपिंपरी येथील रहिवासी सदरील घटनेची माहिती मिळताच मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक अनंतरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपोनि बालाजी गिते यांच्यासह जेमादार चंद्रशेखर मुंडे पॉ. का. विनायक मठपती यांनी पंचनामा केला आहे
सदरील घटनेतील गंभीर जखमी केशव भागवत गाडे यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आल्याचे मुदखेड पोलिसांनी सांगितले असून ठार झालेल्या दोन मिस्त्रीला शवविच्छेदन करण्यासाठी मुदखेड रुग्णालयात नेण्यात आल्याचे कर्तव्यदक्ष ए एस आय गिते यांनी सांगितले आहे

0 Comments