नायगाव तालुक्यातील दोन गावात म्हणजे घुंगराळा व देगांव येथील ग्रामपंचायत कार्यालयाची पोटनिवडणूक दिनांक १८ मे २०२३ रोजी सकाळी घुंगराळा येथे एका जागेसाठी तर देगाव येथे दोन जागेसाठी मतदान होणार असल्याची माहिती नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना दिली आहे
तालुक्यातील घुंगराळा व देगाव येथे ग्रामपंचायतची पोटनिवडणूक असल्यामुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून सदरच्या मतदान केंद्राच्या परिसरात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रतिबंधक आदेश लागू करण्यात आले असल्याची ही माहिती नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी दिली आहे
ग्रामपंचायत कार्यालयाची पोटनिवडणूक असल्याच्या कारणांने घुंगराळा व देगाव येथे कुंटूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित बीट जेमादार संतोष कुमरे व जमादार एम एस कंधारे
यांनी घुंगराळा चौक बंदोबस्त ठेवला तर देगांव येथील बिट जेमादार गिते व ईश्वरे यांनी बंदोबस्त ठेवला असल्याचे कुंटूर पोलिसांनी सांगितले आहे
नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी सांगितले की मतदानाच्या वेळी सुद्धा मतदारांनी न घाबरता मतदान व्यवस्थितपणे करावे असे ही आवाहन तहसीलदार शिंदे यांनी केले आहे

0 Comments