नांदेड ते हैद्राबाद महामार्गावरील दरोड्या प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात तीन आज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल - एलसीबीसह कुंटूर पोलीसाचे संयुक्त पथक तपास जारी करण्यात आला असल्याची पोलीस सूत्रांनी सदरची माहिती दिली आहे
नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गांवर असलेल्या तहसील कार्यालयाच्या पाटी जवळ दिनांक ३० मे २०२३ रोजी संध्याकाळी ठीक ९ ते साडे नऊच्या दरम्यान शंकर नगर कडून खाद्य तेलाची वसुली करून नांदेडकडे जाणाऱ्या कारवर दरोडा टाकण्यात आला आहे
कुंटूर पोलीस ठाण्याच्या हदीतील दरोडा प्रकारणातील कार क्रमांक एम एच २६ बी एक्स ३८४९ ला रस्त्यावर कट का मारली म्हणून वाद घालीत दरोडा टाकणाऱ्या तीन आज्ञात दरोडेखोराच्या विरोधात कुंटूर पोलीस ठाण्यात दिनांक ३१ मे २०२३ रोजी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हदीत आज्ञात ३ दरोडेखोरानी कार मधील पिशवीत असली एकूण रक्कम ११ लाख ६२ हजार ३७३ रुपयाचा दरोडा टाकल्या प्रकरणी सदरच्या आरोपीचा शोध तात्काळ घेण्यासाठी एलसीबीच्या पथकासह कुंटूर पोलीसाचे पथक तयार करण्यात आले असून सदरच्या तपास कामी दोन संयुक्त पथक जारी करण्यात आल्याची माहिती आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत टाकलेल्या दरोड्या प्रकरणी या घटनेतील फिर्यादी युवराज श्रीपतराव निवळे यांनी कुंटूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून आज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदरची वाटमारी दिनांक ३० मे २०२३ रोजी नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गांवर असलेल्या तहसील कार्यालयाच्या पाटी जवळ घडली असल्यामुळे सदरच्या घटनास्थळी देगलूरचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यानी भेट दिली आहे
नांदेड ते हैद्राबाद महामार्गावरील दरोड्या प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात तीन आज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल - एलसीबीसह कुंटूर पोलीसाचे संयुक्त पथक तपास जारी करण्यात असून सदरच्या घटनेचा तपास फौजदार संजय अटकोरे करीत आहेत

0 Comments