माधव पवार
नायगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय घुंगराळा गावच्या महिला सरपंच श्रीमती राधाबाई गंगाधरराव जोगेवार यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने ग्रामपंचायत स्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे
तालुक्यातील घुंगराळा येथील ग्रामपंचायतच्या वतीने उत्कृष्ट सामाजिक कार्य कारणाऱ्या दोन महिलाना नारी शक्तीचा
सन्मान म्हणून दिनांक ३१ मे २०२३ रोजी सकाळी ११ वाजता गावच्या सरपंच श्रीमती राधाबाई गंगाधरराव जोगेवार यांच्या हस्ते दोन महिलाना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे
यावेळी सदरच्या महिलांना ५०० रुपयाचा धनादेश व शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन महिला सरपंचाच्या हस्ते अर्चना जकोजी सुगावे ललिता अशोक पट्टेकर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलले आहे यावेळी सरपंच श्रीमती राधाबाई गंगाधरराव जोगेवार, माजी उपसरपंच भगवानराव पा सुगावे, ग्रा.प.सदस्य किसनाबाई कळकटवाड मोहनराव जोगेवार बापूराव पा. सुगावे आनंदराव यमलवाड मा.ग्रा.प.सदस्य बालाजीराव तुरटवाड ,बळवंत बोंडले बालाजी पा. ढगे, कैलास पा. ढगे दिगांबर गंगासागरे सचीन ढगे ,विलास बोंडले,
संभाजी कवळे,ग्रा.वि.अधिकारी एच. बी.शिंदे साहेब सि.एच.ओ शेख मॅडम लक्ष्मिबाई गिरी धुरपतबाई शिरोळे ढगे ताई ,गिरिजाबाई सुगावे ,ग्रामपंचायत कर्मचारी रामचंद्र ढगे , बाजीराव ढगे, सचिन गजभारे आदी उपस्थीत होते

0 Comments