माधव पवार
धर्माबाद तालुक्यातील राजापूर मार्गे मोटर सायकलवर जात असलेल्या मार्गांवर पुलावर बसलेल्या वानराने अचानकपणे धावत्या मोटरसायकलवर उडी मारल्याने सदरच्या मोटरसायकल वरील एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला असल्याची दुर्दैवी घटना दिनांक १ मे २०२३ रोजी घडली आहे
सदरील घटनेचे सविस्तर व्रत असे की धर्माबाद येथील रहिवासी असलेले अभिषेक होमबहादूर राहणार केशव नगर किशन गड अजमेर हल्ली मुक्काम धर्माबाद आणि कृष्णा बाबुशा शेळके राहणार शांती नगर धर्माबाद हे दोघे जन काही तरी कामासाठी धर्माबाद येथून राजापूर मार्गे नांदेडला जात होते
सदरची मोटार सायकल क्रमांक आर जे ४२५ जी ५८२९ वर पुलावर बसलेल्या वानराने उडी मारल्याने राजापूर जवळ मोटार सायकल वरून खाली पडले यात एक जन जाग्यावर ठार झाला तर पाठीमागे बसलेला जखमी झाला असल्याची घटना घडली आहे
राजापूर येथे घडलेल्या घटनेतील मोटार सायकल चालक अभिषेक होमबहादूर तमु यांच्या डोक्याला मार लागल्यमुळे रक्तस्त्राव होऊन जाग्यावर ठार झाला तर दुसरा एक जन कृष्णा बाबुशा शेळके यांच्या पायाला व छातीला मार लागला असल्याचे सांगण्यात येते तो जखमी झाला आहे
सदरील घडलेल्या घटनेची फिर्याद धर्माबाद पोलीस ठाण्यात मोकलवाड यांनी दिल्यावर सदरच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आडे हे करीत आहेत

0 Comments