Header Ads Widget

महावितरण कंपनीचे वादळी वाऱ्यासह अवकाळीने केले लाखो रुपयाचे नुकसान लाईन स्टैंड करण्यासाठी कर्मचाऱ्यांना करावी लागते तारेवरची कसरत


हिमायतनगर नागोराव शिंदे :- 

हिमायतनगर उपविभागीय कार्यालय महावितरण च्या अंतर्गत येणाऱ्या इस्लापूर  ३३ के व्हि  उपकेंद्रा अंतर्गत जलधरा येथील गावामध्ये  विद्युत पुरवठा सुरळीत करणाऱ्या वाहिन्यांचे ५१  पोल पडून त्या ठिकाणी मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे,
तालुक्यातील पळसपुर  ३३के व्हि सबस्टेशन अंतर्गत डोलारी येथिल  ३  पोल शिरपली येथील ३ पोल धानोरा येथील २ पोल असे हिमायतनगर उपविभाग अंतर्गत अनेक ठिकाणी अनेक वर्षापासून असलेल्या विद्युत वाहिनीचे पोल  तारा तुटून नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे
असल्याचे चित्र असताना भर पावसात भिजत  विद्युत सहायक , तंत्रज्ञ यांचे सह वरिष्ठ अधिकारी यांनी स्वतः उभराहुन ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे 

तात्काळ विद्युत पुरवठा सुरू करून दिलासा दिल्याची माहिती उपविभागीय अधिकारी नागेश लोणे यांनी नायगाव फास्ट न्यूज शि बोलताना दिली आहे यावेळी प्रशांत थोरात ईसलापुर कणिष्ट अभियंता, साहक अभियंता पवनकुमार भंडगे, सरसम येथिल कणिष्ट अभियंता गिरीश दहे  ,ग्रामीण चे कणिष्ट अभियंता शुभम कळसकर, हे आतक परिश्रम घेत आहेत

Post a Comment

0 Comments