नायगाव तालुक्यातील इज्जतगाव येथील अवैध मातीचे उत्खलन केल्या प्रकरणी चौकशी करण्यात यावी म्हणून निवेदन कर्ते बालाजी भुजंगा पवार यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह नायगावच्या तहसीलदाराना निवेदन दिले होते
परंतु तहसीलदारा कडून कसल्याच प्रकारची चौकशी अथवा कारवाई करण्यात आली नसल्यामुळे दिनांक ४ मे २०२३ रोजी अमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता आणि आज नायगावच्या तहसील कार्यालया समोर अमरण उपोषण करण्यात येणार आहे
तालुक्यातील इज्जतगाव येथील दोन ते तीन वीटभटी धारकांनी रॉयल्टीच्या नावाखाली शेकडो ब्रास अवैध मातीचे उत्खलन केले असताना त्या विठ्ठभटी मालकासह मातीची चौकशी करण्यात यावी म्हणून दिनांक २१ एप्रिल २०२३ रोजी निवेदन देण्यात आले होते तहसीलदारानी चौकशी नाही केल्यास दिनांक ४ एप्रिल २०२३ रोजी अमरण उपोषण करण्याचा इशारा ही बालाजी भुजंगा पवार यांनी दिला होता
नायगावच्या तहसीलदारासह माती उत्खलन करणाऱ्या माफीयांना वटनीवर आणण्यासाठी आज लक्ष वेधी अमरण उपोषण करण्यात येत असल्याचे बालाजी पवार यांनी सांगितले आहे

0 Comments