Header Ads Widget

समाधान महाराज शर्मा यांची कहाळा येथील मल्हारी म्हाळसाकांत संस्थांनला भेट..


विशेष प्रतिनिधी / बाळासाहेब पांडे 


महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार परमपूज्य समाधान महाराज शर्मा हे नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र कहाळा येथील श्री मल्हारी म्हाळसाकांत संस्थांनला भेट दिली असता त्यांचा संस्थानाधिपती गुरुवर्य नीळकंठ महाराज कहाळेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे

या प्रसंगी या दोन्ही महान संतांनी संतचरित्रावर चर्चा केली. श्रीक्षेत्र कहाळा येथे नाना महाराज उर्फ सच्चिदानंद तीर्थ स्वामी महाराज यांची संजीवन समाधी आहे. या समाधीस्थळाचे अलौकिक महत्त्व असून सध्या दशहरा उत्सव सुरू असून गणपती पेंड येथील महत्त्व महाराजांनी जाणून घेतले.
    
श्री मल्हारी म्हाळसाकांत संस्थानात संस्थानाधिपती गुरुवर्य निळकंठ महाराज कहाळेकर यांच्या अधिपत्याखाली गेल्या अनेक वर्षापासून श्री चंपाषष्ठी उत्सवासह विविध उत्सव,धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात. हजारो भाविक भक्तांची या उत्सवाला अलोट गर्दी असते 

कहाळा येथील एका कीर्तन कार्यक्रमासाठी आलेल्या परमपूज्य समाधान महाराज शर्मा यांनी श्री मल्हारी म्हाळसाकांत संस्थांनला भेट देऊन येथील संत परंपरेचा अभ्यास केला. संत श्री सचितानंद तीर्थ स्वामी महाराज यांचे चरित्र अलौकिक व समाजाला संदेश देणारे आहे त्यांच्या चरित्राचा सखोल असा अभ्यास करून घेतला.
    
येणाऱ्या काळात दिलेली संतांची किर्तनरुपी सेवा करण्याचे भाग्य लाभल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. या प्रसंगी संतोष महाराज शर्मा, संस्थानातील पुजारी आनंद गुरु, मनोज आरगुलवार, पवन गादेवार, गजानन चौधरी, जयराम, माधव, बालाजी आलसटवार, प्रसाद येरावार, गजानन काशेटवार, यांच्यासह अनेक भाविक भक्तांची उपस्थिती होती.

श्रीक्षेत्र कहाळा पंचक्रोशीतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मल्हारी म्हाळसाकांत संस्थानात येऊन आपण खूप समाधानी झालो आहोत येथील संतांचा आशीर्वाद मिळाला असून संतांच्या आशीर्वादाच्या बळावर आपण किर्तनरुपी सेवा संपूर्ण महाराष्ट्रात करीत असल्याचे समाधान परमपूज्य समाधान महाराज शर्मा यांनी व्यक्त केले आहे

Post a Comment

0 Comments