Header Ads Widget

ग्रामीण भागातील शिवसेनेची फळी मजबूत करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माधवराव पावडे हातात मशाल घेणार !!

       माधव पवार 
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवेसेनेचे सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी व ग्रामीण भागातील शिवसेनेची फळी मजबूत करण्यासाठी शिवसेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख माधवराव पावडे यांनी हातात मशाल घेऊन खेड्या पाडयात पेटविण्यासाठी गाव तिथे शाखा ही महत्वपूर्ण शिवसेच्या माध्यमातून राबविणार असल्याचे नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे
राज्यात महाविकास आघाडी चांगल्या प्रकारे काम करीत असून येणाऱ्या आघामी काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार राहणार असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की नांदेड जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्य चांगल्या प्रकारे असल्यामुळे सन २०२४ साली नांदेड जिल्हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण भगवा केल्या शिवाय शिवसेना पक्ष स्वस्त बसणार असे ते म्हणले आहे

महाराष्ट्राच्या राजकारणात आघामी काळातील लोकसभा व विधानसभा आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक अवघ्या सात आठ महिन्यावर येऊन ठेपल्यामुळे ? असल्यामुळे सदरच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात संबंधित तालुका अध्यक्षांना सोबत घेऊन कार्यकर्त्यांच्या व जन सामान्य माणसाच्या भेटी घाटी घेणार असल्याचे ही पावडे यांनी सांगितले

ग्रामीण भागातील खेड्या पाड्यात बऱ्याच पैकी गावात शिवसेनेच्या शाखा गठीत करणार असल्याचे ही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माधवराव पावडे यांनी सांगितले आहे 

Post a Comment

0 Comments