Header Ads Widget

कुंटूरकर शुगर कारखान्याचे साडेचार लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्ट पूर्ण होणार - राजेश देशमुख कुंटूरकर

         माधव पवार 
महाराष्ट्र राज्यातील इतर कारखान्यापेक्षा दर्जेदार व मोठा कारखाना असलेला नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील कुंटूरकर शुगर कारखान्याचे यंदा अंदाजे साडेचार लाख मॅट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शेतकरी बांधवानो जास्तीत जास्त ऊस लागवडी कडे भर देऊन कारखाना चालवण्याची ताकद मिळवून द्यावे असे आवाहन केले

कुंटूरकर शुगर अँड ऍग्रो प्रा. लिमिटेड कुंटूर या साखर कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक राजेश देशमुख कुंटूरकर यांनी  दिनांक १५ मे २०२३ रोजी आवाहन केले आहे 

तालुक्यातील कुंटूरकर शुगर अँड ऍग्रो प्रा. लि. कुंटूर या साखर कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक  राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या शुभ हस्ते  बालाजी व श्री महालक्ष्मीची  देवतांचे विधिवत् पूजन करून सन २०२३ ते २०२४ सलात गाळप हंगामासाठी ऊस तोडणी वाहतुक ठेकेदारा सोबत करार करण्यास सुरुवात झाली आहे

कुंटूरकर शुगर कारखाना प्रशासनातील व विभागातील अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करून गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न जास्तीचे करावेत असे ही राजेश देशमुख कुंटूरकर यांनी आपले कारखान्याच्या संदर्भात उपस्थितीताना  मार्गदर्शन करीत असताना सांगितले आहे 

याप्रसंगी सर्व ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार मुख्य शेतकी अधिकारी सतीश देशमुख ऊस पुरवठा अधिकारी हरी पाटील इज्जतगावकर त्याच बरोबर कारखान्याचे सर्व अधिकारी व शेती विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments