Header Ads Widget

पंधरा ते वीस दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित शेतकऱ्याचे टोमॅटो गेले वाळून शेतकरी अडचणीत असताना सहाय्यक अभियंता नावालाच विद्युत वितरण कंपनीने भरपाई द्यावी

       मारोती इबितवार 
नायगाव तालुक्यातील माळईकळी येथे शेतकऱ्याच्या विद्युत पंपाची लाईट गेल्या पंधरा दिवसापासून म्हणजे वादळी वाऱ्यापासून खंडित असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील टमाटो पिकांचे मोठे नुकसान झाले आहे
विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे सदरच्या शेतकऱ्याच्या शेतातील टोमॅटो वाळून जात असल्याचे वास्तव चित्र शेतकऱ्याच्या शेतातील टोमॅटोच्या पिकावरून दिसून येत असले तरी सदरची नुकसानीची भरपाई विद्युत वितरण कंपनीने द्यावी अशी मागणी शेतकऱ्यानी केली आहे
तालुक्यातील कुंटूर युनिटचे अभियंता यांनी ईकळीमाळ गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित असताना सुद्धा अधिकारी मात्र झोपेचे सोंग घेऊन बसत आहे की काय असा प्रश्न शेतकरी गटामधून निर्माण झाला आहे
विद्युत वितरण कंपनी शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे हजारो रुपये बिले वसूल केली परंतु कुठेच शेतकऱ्यांच्या उन्हाळी लागवडीसाठी विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे शेतकऱ्यातून संताप व्यक्त केला जात आहे

ईकळीमाळ येथील रहीवासी असलेले गरीब शेतकरी योगेश उत्तमराव शिळे यांनी ४ एकर मध्ये टोमॅटोचे पिक घेतले होते परंतु टोमॅटो ही मोठया लागला होता विद्युत वितरण कंपनीच्या ढिसाळ नियोजनामुळे लाईट गेल्या १५ ते वीस दिवसा पासून नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील टोमॅटो वाळुन जात आहे 

टोमॅटो वाळून जात असल्याने शेतकरी हैराण होत असला त्यांची नुकसान भरपाई कोण ? देणार असा प्रश्न शेतकऱ्यात निर्माण झाला आहे

Post a Comment

0 Comments