Header Ads Widget

सरसम बु येथे दारू बंदी अधिकाऱ्याच्या आशिर्वादामुळे घरपोच मिळते म्हणे देशी दारू तर मग सरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष नावालाच का ? गावच्या भवितव्याला धोक्याचा घंटा !!


हिमायतनगर : नागोराव शिंदे पळसपुरकर 

हिमायतनगर तालुक्यात अवैद्य धंद्यानी डोके वर काढले असून देशी दारू तर अक्षरश भाजी पाल्या सारखी घरपोच मिळत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत असताना सुद्धा दारू बंदी अधिकाऱ्याच्या आशिर्वादामुळे हा प्रकार होते की काय असा प्रश्न चर्चेला जात असला तरी गावातील सरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष नावालाच काय ? असा ही विषय समोर येत आहे.

तालुक्यातील मौजे सरसम बु येथे तर देशी दारूसह विदेशी दारू सुद्धा घरपोच पार्सल केली जाते ? दारू विक्रीचा धंदा जोमात चालू असताना दारू बंदी अधिकारी काय झोपा काढतात की काय असा प्रश्न चर्चेला जात असून यामुळे महिलांवरील अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले जाताहेत तसेच गावातील नवतरुण मुले या व्यसनाच्या आहारी जाऊन आपले भविष्य उध्वस्त करत आहेत

 या बाबीकडे दारू बंदी अधिकारी यांनी अशा बाबीकडे लक्ष देण्याची गरज असून त्याच बरोबर सरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यानी शांतता कमिटीची बैठक घेऊन सदरचा प्रकार गावात हाताळला पाहिजे अस गावातील नागरिकाच मत आहे

दारू बंदीचे अधिकारी या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे  दारू विक्रेत्यांची हिम्मत वाढल ते आता घरोघरी व गल्लोगल्ली जाऊन दारू विक्री करत आहेत. ही बाब कुठे तरी थांबायला हवी. तसेच नांदेड जिल्याचे जिल्हाधिकारी यांनी ही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

यासाठी भोकरच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यानी सुद्धा तातडीने लक्ष द्यावेत असी मागणी होत आहे 


 
     

Post a Comment

0 Comments