Header Ads Widget

संस्कार हा भागवत धर्माचा मूळ पाया असून तो टिकवणे हाच खरा भागवत धर्म होय चैतन्य महाराज कंधारकर उत्तराखंड शुकताल क्षेत्र येथे भागवत कथा प्रारंभ


विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे :- 

संस्कार टिकले की, संस्कृती टिकते,संस्कृती टिकली राष्ट्र टिकते राष्ट्र टिकले मानवी जीवन संस्कार मय घढते यामुळे संस्कार हा सर्वांचा मूळ पाय आहे
म्हणून प्रत्येकांनी भागवतकथेच्या सुसूत्राप्रमाणे प्रमाणे संस्काराचे संगोपन करीत जीवन प्रवास केल्यास त्याला परमोच्च आनंद भेटतो यासाठी प्रत्येक श्रोता वर्गानी भागवत कथा ही श्रवण तर कराच शिवाय त्यातील संस्काराची आपल्या जीवनात उपयुक्तता करून जीवन कृतार्थ करावे असे प्रतिपादन भागवताचार्य ह भ प चैतन्य महाराज कंधारकर यांनी शुकताल येथे भागवत कथेच्या माध्यमातून उपस्थित श्रोते गणाला चतुर्थ दिनी संबोधितांना सांगितले 
शुकताल तीर्थ क्षेत्र येथे ११ मे पासून ह.भ.प. चैतन्य महाराज कंधारकर श्री संत साधुमहाराज संस्थान गंगाखेड यांची भागवत कथा साधू महाराज संस्थान समिती गंगाखेड यांच्या विद्यमाने उत्तराखंड येथील श्रीक्षेत्र शुकताल येथे दि. ११ मे ते १७ मे या कालावधीत श्रीमद् भागवत कथा होत आहे.
    
गेल्या अनेक दिवसांपासून गुरुवर्य चैतन्य महाराज कंधारकर हे भागवत कथा व कीर्तनाच्या माध्यमातून समाजसेवेचे कार्य करीत आहेत. समाजकार्य डोळ्यासमोर ठेवून श्री संत साधुराज यात्रा कमिटीच्या वतीने यंदाचा यात्रेचा कार्यक्रम भागवत कथा शुकताल येथे होत आहे. या कथेला महाराष्ट्रातून  जवळपास ५०० भाविक सहभागी झाले आहेत. 
    
शुकताल येथे दि. ११ मे ते १७ मे दरम्यान श्रीमद् भागवत कथा नामसंकीर्तन महोत्सव मोठ्या उस्थाहात साजरा केला जात आहे.दररोज काकडा, साधुसुधा ग्रँथ पारायण ,भागवत कथा,हरिपाठ, कीर्तन, भजन,ममहाप्रसाद आदी कार्यक्रम  होत आहेत.
साधुसुधा ग्रँथाचे पारायण तातू महाराज कंधारकर व शिवा महाराज सलगरकर,तर समिधा वाचन वसंत सलगरकर हे करीत आहेत.भागवत कथेला ऑर्गन ची साथ नकुल आळदीकर ,तबला साथ अमोल लाकडे नांदेड ,मृदंग साथ माधव उमरगा,गायन साथ तातू महाराज कंधारकर,ज्ञानेश्वर बोरगावकर,संतोष महाराज मोरे सोंनखेडकर, संतोष महाराज परभणीकर,हे साथ देत आहेत

दिनांक १७ मे २०२३ रोजी कथेची सांगता काल्याच्या किर्तनाने व महाप्रसादाने होणार आहे.या निमित्ताने होणाऱ्या सर्व कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थित पार पडावे या साठी संस्थान कमिटीचे पदाधिकारी बालासाहेब लख्खेकर,बाळासाहेब पांडे मांजरमकर, संजय रुद्रवार, शशिकांत पाटील, गजानन पाठक, राजु सलगरकर, बालाजी मेडेवार प्रभाकरराव सलगरकर बालाजी पडगीलवार,कमलाकर गुंजोटीकर,शिवा गुरुजीव सलगरकर,आदी समितीचे सदस्य व शिष्य मंडळ  हे परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

0 Comments