Header Ads Widget

भाजपा पक्ष आणि भाजपा पक्षातील कार्यकर्त्यांचा कल की तुरा आमदार राजेश पवार यांच्या बॅनर वरून गट की तट ? चर्चेचा विषय !!

        माधव पवार
नायगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा रिपाई पक्षांचे विद्यमान आमदार राजेश पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी काढलेल्या बॅनर वर पक्षातील काही नामांकित पुढार्‍यांचे फोटोच नसल्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यात गटातटाचे राजकारण गेल्या अनेक महिन्या पासून चालत असल्याने भाजपांच्या कार्यकर्त्यात होत असलेला गट की तट असा प्रश्न चर्चेला जात असला तरी आमदार राजेश पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देणे योग्य वाटते आहे

भाजप पक्षात ग्रामीण भागात भाजपा अंतर्गत अनेक गट निर्माण झाल्यामुळे खरोखरच कार्यकर्त्यांना तारेवरची कसरत करावी लागत असताना दिसून येत आहे

भाजपातील कार्यकर्त्यांचा आमदार राजेश पवार यांच्यावर बऱ्याच पैकी रोष असल्याचा दावा सदरच्या कार्यकर्त्यांनी करत असले तरी बऱ्याच पैकी कार्यकर्ते आमदार राजेश पवार यांच्या सोबत काम करताना दिसून येत आहेत

याच भाजपा पक्षातील भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्हा सरचिटणीस तथा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर हे सुद्धा भाजपा पक्षात चांगल्या प्रकारे काम करत असताना सर्व भाजपा पक्षाच्या कार्यकर्त्याना एकत्रितपणे सांभाळण्याचे काम करतात आमदार का ? करत नाहीत असा प्रश्न ही चर्चेला जात आहे 

आमदार राजेश पवार यांच्यावर त्यांच्या पक्षातील भजपाचे कार्यकर्ते नाराजी व्यक्त करीत असताना सुद्धा पवार त्यांची नाराजी दूर करण्यासाठी का ? वेळ मिळत नाही असे सदरच्या कार्यकर्त्यानी दावा केला असून सदरचा भाजपा गट हा भाजपा पक्षातीलच असल्यामुळे या पक्षात गट आणि तट कशासाठी असा ही प्रश्न निर्माण झाला तरी आमदार राजेश पवार यांच्या बॅनर वरून नायगाव तालुक्यात चर्चेला उदान आलेले आहे 

Post a Comment

0 Comments