Header Ads Widget

सरकार शिक्षक भरती करत नसल्यामुळे राज्यात हजारो विद्यार्थी डीएड करून घरी हैराण गल्लीत परेशान विध्यार्थी म्हण्याची वेळ म्हणून डीएडचे महत्व झाले कमी - भविष्यातील पिढी धोक्यात ?

            माधव पवार
देशाचा मूळ पाया शिक्षण हे मजबूत करण्यासाठी व नूतन पिढी घडविण्यासाठी शिक्षकांचे मोठे योगदान असते परंतु राज्यात डीएडचा कोर्स करून बसलेले सुशिक्षितीत बेकार विध्यार्थी घरी बसून आहेत राज्यातले सरकार सुशिक्षित बेकार विध्यार्थीना नौकऱ्या देत नसल्यामुळे भविष्यात शिक्षणाचे महत्व कमी होण्याची भीती ? निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे

राज्यात सन १९९० पूर्वी डीएड मोठया प्रमाणात महत्व होते परंतु सध्याच्या परिस्थिती मध्ये मिरिट मध्ये येणारा विध्यार्थी डी एडच्या कोर्सकडे धजावत नाही कारण अगोदरच राज्यात डी एड करून बसलेले सुशिक्षित बेरोजगार विध्यार्थी शासन नौकऱ्या देत नसल्यामुळे शेती वळले आहे
शासनाने शिक्षक भरती करत नसल्यामुळे सदरच्या विध्यार्थीवर उपवास मारीची वेळ आली असून अनेक विध्यार्थी शिक्षकाचे स्वप्न पाहिले परंतु शिक्षक भरती होत नसल्यामुळे विध्यार्थीना एक काम होत नाही आणि शासन नौकऱ्या ही देत नसल्यामुळे एका मराठी म्हणी प्रमाणे हैराण गल्ली परेशान विध्यार्थी म्हण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपली आहे 

महाराष्ट्र राज्यातील सन १९७७ ते १९७८ साली विध्यार्थी डी एड करण्यासाठी प्रयत्न करीत होते परंतु सध्याच्या परिस्थितीत राज्याचा इतिहास पाहिला तर गेल्या दहा वर्षा पासून जिल्हा परिषद शाळेवर नवीन डीएड करून आलेला विध्यार्थी शिक्षक म्हणून शाळेवर कार्यरत नसल्याचे वास्तव चित्र ग्रामीण भागात दिसून येत असून अगोदरचेच शिक्षक बदल्या होऊन येत आहेत 

Post a Comment

0 Comments