Header Ads Widget

इज्जतगाव येथे सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक दोन डोईफोडे गटात होत असल्याने निवडणुकीला चढला रंग

             माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे इज्जतगाव येथे सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक दोन डोईफोडे गटात होत असल्यामुळे सदरच्या निवडणुकीला चांगलाच रंग भरला असल्याचे वास्तव चित्र इज्जतगाव येथे दिसून येत आहे

इज्जतगाव येथील शिवशाही शेतकरी विकास पॅनल प्रमुख हरी पाटील डोईफोडे इज्जतगावकर व शेतकरी विकास गटाचे पॅनल प्रमुख संजीव पाटील इज्जतगावकर यांच्या गटात सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक चांगलीच रंगली आहे 

तालुक्यातील मौजे इज्जतगाव येथे सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकी मध्ये आपापले उमेदवार मोठ्या जिद्दीने निवडून आणण्यासाठी दोन्ही गटाचे पॅनल प्रमुख प्रयत्न करीत असल्याचे ही वास्तव चित्र इज्जतगाव येथे पाहावयास मिळत असले तरी सदरच्या निवडणुकीचा अंतिम टप्पा दिनांक ७ मे २०२३ रोजी संपणार असून मतदार दिनांक ८ मे २०२३ रोजी मतदान होणार आहे 

सेवा सहकारी सोसायटीचे पॅनल प्रमुख हरी पाटील डोईफोडे इज्जतगावकर यांनी आपले पॅनल सदरच्या निवडणुकीत उभे केले तर दुसऱ्या गटाचे संजीव पाटील इज्जतगावकर यांनी सुद्धा त्यांच्या गटाचे पॅनल उभे करून चांगलाच सदरच्या निवडणुकीला रंग चढविला आहे

इज्जतगाव येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीकडे अख्या नायगाव तालुक्याचे लक्ष लागले असून सदरची निवडणूक दोन डोईफोडे गटात होत असल्याने निवडणुकीला चांगलाच रंग भरला आहे 

Post a Comment

0 Comments