नायगाव तालुक्यातील मौजे माळईकळी येथील गेल्या काही वर्षा पासून चालत असलेला गायरान जमिनीचा होत असलेला वाद नांदेड जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यासह नायगावच्या तहसील प्रशासनाने ईकळीमाळच्या गायरान जमिनीकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास वाद संपुष्टात येऊ शकतो ? अन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी तोडगा काढावा असी मागणी जनतेतुन केल्या जात आहेतालुक्यातील ईकळीमाळ येथे गावच्या राजकारणानी सदरच्या गावालाच पछाडल असल्यामुळे गावांत अनेक वेळा तणाव परिस्थिती निर्माण झाल्याचे वास्तव चित्र पाहावयास मिळत असून सदरच्या गावातील सध्याच्या परिस्थितीत गावात शांतता अबाधित असल्यामुळे मोठया प्रमाणात निर्वाळला असल्याचे सदरच्या गावात दिसून येत आहे
माळ ईकळी हे गाव संताचे गाव असून या ठिकाणी संत परबतेश्वर महाराजाची भूमि असल्यामुळे सदरील गावांत शांतता टिकून राहण्यासाठी योग्य पर्याय निघत नसल्यामुळे या वादग्रस्त गावांत तणावाचे वातावरण निर्माण होत असल्यामुळे सुवर्ण दलितात अधून मधून ठिगंणी पेटत राहत असल्यामुळे या संताच्या भूमीचा वाद मिटविण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या नायगावच्या तहसीलदारानी लक्ष देण्याची गरज आहे
संताच्या भूमितील रहिवासी असलेले एकनाथ जगजेराव पाटील सुगावे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी गावांत येऊन पाहणी करावी व आम्हाला न्याय मिळवून देण्या बरोबर सदरचा वाद प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे होत असून या बाबीला प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप थेट जिल्हाधिकारी यांच्यावरच करण्यात आला असून प्रशासनाने आमचे स्थालंतर करावे असे सुगावे यांचे म्हणे आहे

0 Comments