Header Ads Widget

खाजगी जीपने कोचिंग क्लास जाणाऱ्या पारवा बु येथील सहा विध्यार्थीनी अपघात झाल्याने जखमी हिमायतनगर तालुक्यातील घटना - चालकांचा निष्काळजीपणा ?


हिमायतनगर  : नागोराव शिंदे :- 

तालुक्यातील पारवा खुर्द येथील काही विद्यार्थिनी क्लासेस साठी खाजगी जीपने हिमायतनगरला जात असताना जिप चालकांच्या निष्काळजीपणामुळे गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पलटी झाली त्यामध्ये जात असलेल्या शालेय विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या अपघात होताच घटनास्थळावरून चालकानी पोबारा केला आहे 

प्रवाशांनी खाजगी वाहनांमध्ये जखमी मुलींना प्रार्थमिक आरोग्य केंद्र सरसम येथे नेऊन प्रथम उपचार करून पालकांनी हिमायतनगर येथील खाजगी दवाखान्यामध्ये पुढील उपचारासाठी नेऊन उपचार चालू  केल्याची घटना घडली आहे 

पोटा बु येथील महिंद्रा मॅक्स एम एच०६ ए.एल. ९३ ३३  या क्रमांकाची खाजगी प्रवासी जिप गाडी काही प्रवासी घेऊन हिमायतनगर जात असताना ड्रायव्हर चालकांच्या निष्काळजीपणामुळे राष्ट्रीय महामार्गावर पोटा बुद्रुक शिवारातील टोल नाक्याजवळ गाडीवरील ताबा सुटल्याने गाडीने पलटी खाली त्यामध्ये असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कुमारी स्नेहा विलासराव जाधव, समृद्धी पंडितराव जाधव, ऋतुजा कोंडबाराव जाधव वेदिका पंडितराव जाधव - 

इयत्ता दहावी व पुनम राजू पतंगे इयत्ता  अकरावी वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी हे सर्व हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळा हिमायतनगर क्लास साठी जात असताना जखमी झाल्या अपघात घडताच घटनास्थळावरून चालकाने पोबारा केल्याने काही प्रवाशांनी दुसऱ्या वाहनांमध्ये विद्यार्थिनींना टाकून प्राथमिक आरोग्य केंद्र सरसम येथे दाखल करून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नकाते यांनी विद्यार्थिनीवर प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी पालकांच्या विनंतीवरून त्यांना खाजगी रुग्णालय हिमायतनगर येथे पाठवण्यात आले.

ही घटना घडतात घटनेची माहिती परिसरामध्ये वाऱ्यासारखी पसरली घटनास्थळावर बघाची मोठी गर्दी जमली होती तर आपल्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या आई वडिलांची मात्र झोपच उडाली गावातील अनेक नागरिकास आई-वडील आपल्या पाल्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात हजर झाले.

राष्ट्रीय महामार्गावर गाड्यांचा वेग वाढला असून खाजगी वाहतुकीतून प्रवास करताना केव्हा जीवावर बेतल याबद्दल कल्पनाही करता येणार नाही कारण अनेक खाजगी वाहने कालबाह्य झाली असली तरीही ती प्रवासी घेऊन प्रवास करतात

तर अनेक खाजगी वाहनावर कमी वयाची ही ड्रायव्हर ड्रायव्हिंग करीत असतात दराने मध्य धुंद अवस्थेमध्ये ही ड्रायव्हिंग करीत असल्याने या राष्ट्रीय महामार्गावर केव्हा कोणती घटना होईल याचा अंदाज नाही ड्रायव्हिंगचा निष्काळजीपणा वारंवार पहावयास मिळत आहे .

त्यामुळे या मार्गावर लहान-मोठे अनेक अपघात सातत्याने होत आहेत परंतु प्रशासन मात्र अशा चालकावर व कालबाह्य झालेल्या वाहनावर दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

घटनेचे वृत्त लिहीपर्यंत जखमी विद्यार्थिनीवर खाजगी रुग्णालयात उपचार चालू असून निष्काळजीपणाने महिंद्रा मॅक्स जीप चालविणाऱ्या चालकाच्या  विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असल्याचे आमच्या हिमायतनगरच्या प्रतिनिधीने सांगितले आहे 


Post a Comment

0 Comments