नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला शासनाने बांधकाम करण्यासाठी परवानगी दिली लाखो रुपयाची दवाखान्याची इमारत बांधून रुग्णाच्या सेवेत देण्या ऐवजी सध्याच्या परिस्थितीत रुग्णाविना वाऱ्यावर असल्यामुळे जनतेतुन संताप व्यक्त केला जात आहे
बरबडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची नूतन इमारत गुत्तेदाराने सुसज्ज इमारत बांधून सदरचे काम पूर्ण केले असताना सुद्धा या रुग्णालयात लाइटिंगची व्यस्था करण्यात आली नसल्यामुळे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यासह रुग्ण इमारती विना बे वारस आहेत
तालुक्यातील बरबडा प्राथमिक आरोग्य केंद्र बांधून सुद्धा लाइटिंग करण्यात येत नसल्यामुळे आरोग्य विभागाचा आंधळा कारभार दिसून येत असून सदरची नूतन इमारत रुग्णाच्या सेवेत लवकर येईल असे जनतेसह रुग्णालयातील रुग्णाला वैद्यकीय अधिकारी यांच्या सह येथील कर्मचाऱ्याना वाटले होते परंतु प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे सदरची धुळखात पडली आहे
बरबडा प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून घेण्यासाठी स्थानिक पुढारी मोठया प्रमाणात मेहनत व पाठपुरावा केला होता परंतु शासनाच्या या दिरंगाईमुळे लाखो रुपयाची बांधण्यात आलेली नूतन इमारत आता जुन्नी होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत असून महाराष्ट्र शासन एकीकडे रुग्णाला दर्जेदार सेवा देत असल्याचे सांगते तर दुसऱ्या बाजूने या दवाखान्याची एकंदरीत वाट लावत असल्याचे जन सामान्य माणसातून बोलल्या जात आहे

0 Comments