Header Ads Widget

नायगाव शहरासह नरसीच्या चौकात वाहतुकीला ब्रेक लागण्यासाठी सिग्नल कार्यान्वित करा - जनतेची मागणी

नायगाव प्रतिनिधी : मधुकर जवळे - 

नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या नायगाव शहारासह नरसीच्या चौकात वाहतुकीची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते त्या अनुषंगाने येणाऱ्या व जाणाऱ्या वाहतुकी व जन सामान्य माणसाला कुठे तरी ब्रेक लागावे म्हणून शासनाने सिग्नलची व्यवस्था तात्काळ कार्यन्वित करावी अशी मागणी जनसामान्य माणसातून केल्या जात आहे 
नायगाव शहारासह नरसी चौक हे शहाराच्या तुलनेत बरोबर असल्यामुळे व हे मार्ग तीन राज्याला जोडल्या गेल्यामुळे यात तामिळनाडू कर्नाटक व आंध्रप्रदेश राज्यातला जाण्यासाठी बसेस मोठ मोठे ट्रक या मार्गावरून वाहतूक रात्रंदिवस होत आहे
नायगाव हेडगेवार चौकातून नरसी चौकातुन या तिन्ही राज्यातून वाहतूक होत असते आणि या ठिकाणी जनतेची ही मोठया प्रमाणात गर्दी असल्यामुळे वाहनाचा सामना करीत व जनतेला जीव मुठीत धरून ओलांडून जावे लागत आहे

तालुक्यातील नायगाव व नरसीच्या स्थानिक पुढाऱ्यानी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन सदरच्या मागणीचा पाठपुरावा केल्यास या नायगावच्या हेडगेवार चौकासह नरसीच्या चौकात काही महिन्यात सिंग्नलची जनतेच्या हितासाठी योग्य ठरेल असे ही सदरच्या जनतेतुन बोलल्या जातं असून भरधाव वेगात येणाऱ्या वाहणाना सदरच्या सिंग्नल मुळे ब्रेक लागेल व जनतेची सुरक्षा जास्तीचे वाढेल असे जनतेतून बोलल्या जात आहे



Post a Comment

0 Comments