माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथील पवित्र ठिकाण असलेल्या गोदावरी नदी काठावर शेतकरी नेते तथा काँग्रेसचे नायगाव विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार कवळे गुरुजी यांच्या शुभ हस्ते अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याच्या निमित्ताने गोदावरी काठावर गंगापूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे
तालुक्यातील मौजे बरबडा येथील पवित्र ठिकाण असलेल्या गोदावरी नदीच्या काठावर गंगापूजन सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त सदरच्या कार्यक्रमाला विशेष मान्यवरांची उपस्थिती होती शेतकरी नेते कवळे गुरुजी हे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून डोळस विचारांचा जनसंदेश जनतेला देत असल्याचे सदरच्या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातून दिसून येत आहे
नायगाव विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार म्हणून जनसामान्यातलौकिक झाले असलेले शेतकरी नेते कवळे गुरुजी दिनांक २५ मे २०२३ रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान बरबडा नगरीत आगमन झाल्याच्या नंतर सदरच्या भव्य कार्यक्रमात या शेतकरी पुत्रांचा गावच्या वतीने मोठा सन्मान करण्यात आला आहे बरबडा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमाला मान्यवरांचे उपस्थिती होती व ती वतीती
यावेळी ह्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने बरबडा व खूजडा येथे सव्वाखंडी तांदळाची महापूजा करून महाप्रसादाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
८९ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या महत्वपूर्ण कार्यक्रमाच्या सोहळ्यासाठी शेतकरी नेते कवळी गुरुजी यांच्यासह या विभागातील राजकीय पुढारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते

0 Comments