Header Ads Widget

मनुरच्या सेवा सहकारी सोसायटीचे नूतन चेअरमन माजी मुख्याध्यापक जी एम शिंदे यांची तर व्हाईस चेअरमन गुणाजी पाटील शिंदे यांची बिनविरोध निवड !!

        माधव पवार 
नायगाव तालुक्यातील मौजे मनूर त.ब. सेवा सहकारी सोसायटीची निवड नुकतीच पार पडली असल्यामुळे रुई बु.येथील तत्कालीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक जि एम शिंदे यांची सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन म्हणून तर व्हाईस चेअरमन गुणाजी पाटील शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे 

तालुक्यातील मनूर येथे सेवा सहकारी सोसायटी मनूर 
येथील चेअरमन पदाची निवड निर्वाचन अधिकारी म्हणून अली साहेब यांच्या आधिपत्याखाली पार पडली असून यावेळी चेअरमन म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोविंद महाजनराव शिंदे यांची चेअरमन पदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली तर गुणाजी भाऊराव पाटील शिंदे यांची व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे

मनूर येथील गावातील मंडळी व सर्व सदस्य यांच्यातर्फे ज्येष्ठ नागरिक माजी सरपंच पुंडलिक पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला वाडी येथील पाहुणे माधवराव ढगे   तसेच तुकाराम पाटील ईजतगावकर या पाहुणे तर्फे चेअरमन सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला आहे

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पॅनल प्रमुख प्रल्हादराव पाटील यांनी केले आभार  चेअरमन गोविंदराव शिंदे यांनी 
 मानले 

Post a Comment

0 Comments