Header Ads Widget

सोमठाण्याच्या सेवा सहकारी सोसायटीचे नूतन चेअरमन पदी मारोतीराव पाटील कदम तर व्हाईस चेअरमन पदी नामदेव शिंदे यांची बिन विरोध निवड !!

        माधव पवार
नायगाव तालुक्यातील सोमठाणा सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन चेअरमन पदी मारोती पांडुरंग पाटील कदम ( पांडे  ) तर व्हाईस चेअरमन पदी नामदेव शंकरराव पाटील शिंदे पाटनुरे यांची नुकतीच बिन विरोध निवड करण्यात आली असून या निवडी दरम्यान नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे व नव निर्वाचित सदस्यांचे गावचे विद्यमान सरपंच प्रतिनिधी मारोतराव कदम यांनी अभिनंदन केले आहे 

तालुक्यातील सोमठाणा सेवा सहकारी सोसायटीचे 
चेरमन व्हॉइस चेरमन पदाची निवड २७ मे २०२३ रोजी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड पार पडली  यावेळी संचालक पांडुरंग हनमंतराव पाटील कदम मारोतराव चंद्रभान पाटील शिंदे श्रीहरी नागोराव कदम  सुनील बाबुराव शिंदे प्रकाश संभाजीराव कदम श्रीहरी माधवराव कदम सुधाकर माधवराव कदम आनंदा बळीराम कदम रेश्माजी मोहनाजी शास्त्री शामराव गायकवाड व्यंकटी कमळे याची निवडीच्या सभागृहात उपस्थिती होती 

सोमठाणा येथे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी एस के व बी एस राठोड यांनी काम पाहिले तर सदरील निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अतिशय तळमळीने सहकार्य गावचे माजी सरपंच साहेबराव पुंडलिकराव पाटील कदम माजी सभापती प्रतिनिधी प्रचार्य मनोहर पवार ,विद्यमान सरपंच मारोतराव शंकरराव कदम ,माजी चेअरमन तथा ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर बळीराम पाटील कदम शहाजी पाटील कदम गावकऱ्यांच्या सहकार्यचे एकीचे बळ दिसून आले आहे 


Post a Comment

0 Comments