Header Ads Widget

सौ पूनमताई राजेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी ८१ निराधार योजनेसाठी केले लाभार्थी पात्र

                माधव पवार
नायगाव तालुक्यातील बऱ्याच पैकी गावातील निराधार लाभार्थीनी तहसील कार्यालयाकडे अर्ज दाखल केले होते सदरच्या निराधार लोकांची दाखल घेऊन नायगावचे कर्तव्यदक्ष तहसीलदार गजानन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ३१ मे २०२३ रोजी तहसील कार्यालयात महत्वाची बैठक घेण्यात आली आहे

संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना तसेच वयोवृद्ध योजना या योजनेच्या ८१ पात्र लाभार्थी म्हणून त्यांच्या फाईली मंजूर करण्यात आल्या असल्याची माहिती तहसीलदार गजानन शिंदे यांनी दिली आहे 
नायगावच्या तहसील कार्यालयात आलेल्या महत्व पूर्ण बैठकी दरम्यान दिनांक ३१ मे २०२३ रोजी निराधार योजनेची  बैठक घेण्यात आली व यावे बैठकीत एकूण निराधार लाभार्थी योजनेचे ८१ निराधार लाभार्थी मंजूर करण्यात आले असल्यामुळे त्यांना शासना कडून आर्थिक लाभ मिळणार आहे

 या बैठकीसाठी नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एल आर वाजे नायगाव संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष व सदस्य सौ पूनम ताई  राजेश  पवार अध्यक्ष सर्व सदस्य बालाजी घोसलवाड सौ ताराबाई  बापुराव बोमनाळे गंगाधर दिगांबर बडूरे नागोराव पिराजी मेटकर गोपिनाथ लक्ष्मण सांगवीकर उपस्थित होते 

यावेळी मुंडे प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हा कार्यध्यक्ष नांदेड व तहसीलचे कर्मचारी सौ संध्या ताई मांजरमकर मॅडम भास्कर मोरे यांच्या आदी यावेळी उपस्थित होते 

Post a Comment

0 Comments