महाराष्ट्र राज्याच्या सत्ता संघर्षाचा परिणाम शेतकऱ्यासह जनतेवर पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना विमा अद्याप पूर्ण मिळाला नसल्यामुळे त्याच बरोबर वादळी वाऱ्यासह घराचा पाऊस पडून शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले असताना सुद्धा शेतकऱ्यांना कसल्याच प्रकारची तात्काळ आर्थिक मदत मिळत नसल्यामुळे शेतकरी चांगलाच वैतागला आहे
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मात करण्यासाठी राजकीय पुढारी नावालाच असल्याचे शेतकरी वर्गातून बोलल्या जात असून राज्यात गेल्या वर्षापासून सत्ता संघर्षाचा मोठा खेळ खंडोबा झाला असल्यामुळे शेतकरी वर्ग मोठा हैराण झाला असल्याचे वास्तव चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहेसत्ता संघर्षमय घडामोडीत राज्यातला शेतकरी वाऱ्यावर असल्याचे स्पष्ट शेतकऱ्यातून बोलल्या जात असले तरी सध्याच्या परिस्थितीत अवकाळी पावसाने व गाराचा पाऊस त्याच बरोबर विजेचा कडकडाट होऊन शेतकऱ्याचे उन्हाळी लागवडीचे मोठे नुकसान झाले आहे
त्याच बरोबर गोरगरीब कुटुंबाच्या घरावरील टीना पत्रे उडून जाऊन अनेकांचे संसार उध्वस्त झाले असताना सुद्धा प्रशासन झोपेतच का ? असा प्रश्न चर्चेला जात आहे

0 Comments