आदिवासी कोळी महादेव जमातीच्या संबंधीत मागण्या संदर्भात दिनांक २१ एप्रिल २०२३ रोजी जिल्हाधिकारी नांदेड याना निवेदन देण्यात आले होते त्यात सर्व उपविभागीय कार्यालयामार्फत कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने देण्यात यावेत
नांदेड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालयातून दिलेल्या प्रमाणपत्रांची चौकशी करण्यात येवू नये,नायगाव. बिलोली, देगलूर, मुखेड तालुक्यात कोळी महादेव जमातीस उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांनी दिलेल्या प्रमाणपत्राची चौकशी करू नये, त्यांनी दिलेले प्रमाणपत्र त्यांनी त्यांच्या कायदेशीररित्या दिलेले आहेत
कोळी महादेव जमातीच्या लोकांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास त्यांना सुद्धा कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र गृह पंचनामा करून देण्यात यावेत आदी मागण्या संदर्भात कोणतीही कारवाई अथवा सूचना पत्र न दिल्यामुळे दि. २५ एप्रिल २०२३ रोजी पुढील मागण्या मान्य होई पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय समोर प्रल्हाद गंगाधर मदेवाड, युवा जिल्हाध्यक्ष कोळी महासंघ नांदेउ ,शंकर मनाळकर जिल्हाध्यक्ष कोळी महासंघ ,शशिकांत भुशेवाड ,हंममंत बोईनवाड व सूर्यकांत पोलंकमवाड ,जिल्हाध्यक्ष पवनकुमार पुठ्ठेवाड , व त्यांचे सहकारी साखळी उपोषणास बसले होते.
त्याअनुषंगाने नांदेड जिल्हातिल सर्व उपविभागिय अधिकारी कार्यालयामार्फत दिल्या गेलेले दिनांक २२ जुन २०१६ पुर्वीचे कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र दि. २२ जुन २०१६ च्या शासकिय परिपत्रकानुसार नविन सी- फॉरमेटवर व केद्रीय फॉर्मेट मध्ये बदल करुन नविन फॉर्मेट तात्काळ देण्यात यावेत. सर्व उपविभागीय अधिकारी यांना पत्र व्यवहार करुन वनीन सी- फॉर्मेट व केंद्रीय फॉर्मेट मध्ये प्रमाणपत्र देण्यांचे आदेशीत करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दिनांक २५ एप्रिल रोजी बसलेल्या साखळी उपोषणाला अप्पर जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिनांक २७ एप्रिल रोजी महसुल मंत्री यांना एक पत्र पाठवून एक बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे असे पत्र देवुन निमंत्रीत केलेले आहे.
तरी ही बैठक केव्हा व कधी आहे.ते आपणास कळवून आपल्या शिष्ठ मंडळास बैठकिसाठी निमंत्रीत करणार असून सहकार्य करण्याचे आवाहन करून लेखी पत्र दिल्याने सदरचे साखळी उपोषण माघार घेण्यात आले असून वरील मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास प्रल्हाद मदेवाड यांनी दि.१५ मे पासून उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
""" जिल्हाधिकारी यांनी दिले आदेश !! ""
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आदिवासी कोळी महादेव समाजाच्या विध्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देण्याचे व आदिवासी विभागाकडून मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ देण्याचे पत्र एकात्मिक विकास प्रकल्प अधिकारी किनवट याना देऊन आदेशीत केले आहे.
""" उपोषणास अनेक राजकीय नेत्यांनी भेट """
आदिवासी कोळी महादेव जमातीच्या विविध मागण्या संदर्भात दि. २५ एप्रिल २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर बसलेल्या साखळी उपोषणास काँग्रेसचे माजी नगरसेवक व्यंकट मोदिराज ,वंचित आघाडीचे नेते श्याम निलंगेकर ,भाजपाचे नेते बालाजी बच्चेवार ,भाजपाचे चैतन्यबापू देशमुख , यांनी भेट देऊन महसूल मंत्री यांचे स्वीयसहाय्यक यशवंत माने यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन संबंधित मागण्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले आहे.

0 Comments