Header Ads Widget

नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेस भाजपा युती जुळविण्यात मा.शिवराज पाटील होटाळकर पॉवर फुल !!

      माधव पवार
जिल्ह्यातील हिमायतनगर नांदेड भोकर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाला पराजय पतकरावा लागला आहे परंतु नायागांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी दरम्यान भाजपाचे नांदेड जिल्ह्याचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर व नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण काँग्रेस भाजपा युतीचा समजोता घडवून आणले मा. शिवराज पाटील होटाळकर यांनी पॉवर फुल ठरले आहे

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जिल्ह्यातील नायगावसह कुंटूर भाजप काँग्रेसच्या युती दरम्यान या दोनच मार्केट कमिटीवर भाजप व काँग्रेसची सत्ता कायम आहे 
नायगाव तालुक्यातील कुंटूर मार्केट कमीटीच्या निवडणुकीत सुद्धा अशाच पद्धतीचा नायगाव पॅटर्न राबविण्यात आला सदरच्या निवडणुकीत भाजपाचा १ संचालक बिनविरोध तर ९ मत पेटीतून विजयी झाले आहेत तर काँग्रेसचे एकूण ८ संचालक निवडुन आले सदर प्रयोग यशस्वी करण्यासाठी राजेश देशमुख कुंटूरकर आंबादासराव धर्माधिकारी प्रा रवींद्र पाटील चव्हाण बालाजी मदेवाड मनोज पाटील टाकळीकर प्राचार्य मनोहर पवार यांचे योगदान मोठया प्रमाणात आहे नायगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेस पक्षाचीच सत्ता होती परंतु सत्तेत काही तरी बदल घडावा म्हणून २०२३ मध्ये माजी शिक्षण सभापती तथा भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्हा सरचिटणीस शिवराज पाटील होटाळकर यांनी मोठा मास्टर माईन्ड लावून काँग्रेस सोबत भाजपा अशी युती करून ६ संचालक बिनविरोध काढण्यात यश मिळविले आहे

जिल्ह्यात इतिहास घडवून आणला राजकीय वर्तुळात आपले वजन कायम ठेवत कृषी उत्पन्न बाजार समिती नायगगाव येथे वर्चस्व कायम ठेवले आहे 

Post a Comment

0 Comments