नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागातील खेड्या पाडयात एकीकडे लग्न सोहळ्याचा धूमधडाका दुसरीकडे दररोज मग गर्जेनेसह वादळी वारा सुसांड सुटून तुफानी गाराचा मारा आणि धुव्वा पाऊस पडत असल्यामुळे लग्न संभारभासाठी आलेल्या सोयाऱ्या धायऱ्याची व वऱ्हाडी लोकांची मोठी पंचायत होत असल्याचे वास्तव चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहेतालुक्यातील अनेक गावांत आई वडिलानी आपल्या मुलां मुलीचे नातेवाईक मोठया थाटाने लग्न सोहळे जमवून लग्नाच्या तारखी काढल्या आहेत व मे महिन्यात मोठया प्रमाणात लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहेत परंतु दररोज आवकाळी पाऊस पडत असल्यामुळे घर मालकसह नातेवाईक गाराच्या भीतीने हतबल झाल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहेगेल्या वर्षाच्या उन्हाळ्याच्या तुलनेत पाहिले तर या वर्षी भर कडाक्याच्या उन्हाळ्यात पावसाळा चालू असल्याने लग्न सोहळ्यासाठी येणाऱ्या व जाणाऱ्या लोकांची मोठी पाजगत होताना दिसून येत असून दिनांक २ मे २०२३ रोजी ग्रामीण भागात मोठे प्रमाणात लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आले परंतु हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी पावसासह वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे
ग्रामीण भागात एकीकडे लग्नाचा धूमधडाका दुसरीकडे वादळी वाऱ्यासह गाराचा मारा वऱ्हाडी मंडळीची होतोय पंचायत असे चित्र दिसून येत आहे

0 Comments