Header Ads Widget

कुंटूर पोलीस ठाण्यात फिर्यादीची तक्रार एक त्यांच्या सोयीने गुन्हा केला दाखल - ? फिर्यादीचा पोलीसावर !!


नायगाव ता.प्र. मधुकर जवळे  - 

नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या कुंटूर तांडा येथील शेतातील शेत गट क्रमांक ६०९ ,६१२ मध्ये असलेला हरभरा व ज्वारीचे पीकाची लागवड करण्यात आली होती परंतु सदरील पिकाची नासधूस करून शेतामधील लागवड केलेले मे. शेतात जाण्यासाठी कोर्टाचा मनाई आदेश असताना सुद्धा शेतातील हरभरा व ज्वारी परस्पर काढून नेल्याची तक्रार दिनांक १२ मार्च २०२३ रोजी कुंटूर ठाण्यात देण्यात आली होती

तालुक्यातील घुंगराळा येथील रहिवासी असलेले तक्रारदार शंकर नारायण यम्मलवाड यांनी कुंटूर पोलीस ठाण्यात दाखल केल्याच्या नंतर  फिर्यादीच्या तक्रारीनुसार  गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचा आरोप शंकर नारायण यमलवाड याने थेट पोलिसांवर केला आहे 

कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कुंटूर तांडा येथे सदरचा प्रकार दिनांक १२ मार्च २०२३ रोजी दुपारी ५ वाजण्याच्या दरम्यान घडला असल्यामुळे फिर्यादी शंकर नारायण यमलवाड यांनी पोलिसात तक्रार दिली होती परंतु फिर्यादीच्या म्हणण्यानुसार तक्रार एक दिली आणि पोलिसांच्या सोयीनुसार गैर अर्जदारावर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप पोलिसांच्या वडिलांनी पोलीसावर केला आहे

घुंगराळा येथील रहिवासी असलेले शंकर यमलवाड यांनी दिलेल्या तक्रारीत असा आरोप केला की सर्व पीक काढून नेल्याच्या नंतर सुद्धा राहिलेले शिल्लक पीक गैर अर्जदारांनी काढून नेला असल्याचा थेट आरोप पोलिसावर करीत सदरचे पीक काढून नेत असताना त्या पिकाचे व्हिडिओ व रेकॉर्ड मोबाईल मध्ये कैद करण्यात आले कुंटूर पोलिसांनी त्यांची दखल न घेता त्यांच्या सोयीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा खणखणीत आरोप शंकर नारायण केला आहे यमलवाड यांनी केला आहे 




Post a Comment

0 Comments