Header Ads Widget

राष्ट्रवादीने काँग्रेस पक्षाच्या संपर्कात राहून कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणुकीसाठी फार्म दाखल केलाच नाही माजी प्राचार्य मनोहर पवार यांचा दावा !!

         माधव पवार
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मित्र पक्ष असले तरी नायगाव तालुक्यातील कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस पक्षाच्या संपर्कात राहून निवडणुकीसाठी कसल्याच प्रकारचे उमेदवारी अर्ज दाखल केलेच नाहीत असा दावा काँग्रेस पक्षाचे अनुसुचीत जाती काँग्रेस कमिटी नांदेड जिल्हाध्यक्ष माजी प्राचार्य मनोहर पवार यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना केला आहे

राष्ट्रवादीने काँग्रेस पक्षाच्या संपर्कात राहून कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणुकीसाठी फार्म दाखल केलाच नाही माजी प्राचार्य मनोहर पवार यांचा दावा केला आहे 

नायगाव तालुक्यातील कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणुकीचे उमेदवार जाहीर झाल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने असा दावा केला की राष्ट्रवादी व काँग्रेस पक्ष मित्र पक्ष असताना सुद्धा आम्हाला सोबत घेऊन चालले नाही ऐन वेळेला धक्का दिल्याचा दावा राष्ट्रवादीने केला होता आणि दावा करणे चुकीचे असल्याचे मा. प्रचार्य यांनी केला आहे 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दाव्याला प्रतिउत्तर देताना काँग्रेस पक्षाचे माजी प्राचार्य मनोहर पवार यांनी म्हटले की राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या संपर्कात राहून कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केलीच नाही तर काँग्रेस पक्षाकडे बोट दाखविण्याची आवश्यकताच भासत नसल्याचा दावा मा.प्राचार्य पवार यांनी यावेळी केला आहे

कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणुकीत दुसऱ्याच्या आधिपत्याखाली राहून राष्ट्रवादी काँग्रेसने दोन ते तीन उमेदवारी दाखल केली होती आता काँग्रेस पक्षाकडे बोट दाखविणे हे कितपत खर ठरू शकते राष्ट्रवादी काँग्रेसने असे म्हटले की काँग्रेस पक्षा कडून राष्ट्रवादी काँग्रेसचा गेम करण्यात आला हा केलेला आरोप चुकीचा असल्याचे ही माजी प्रचार्य तथा अनुसुचीत जाती काँग्रेस कमिटी नांदेड जिल्हाध्यक्ष मनोहर पवार यांनी सरळ सरळ राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे 






Post a Comment

0 Comments