Header Ads Widget

कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाचा काँग्रेस भाजपा कडून गेम -२८ विरुद्ध १७ उमेदवार रिंगण गाजवणवार !! -

         माधव पवार
नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या कुंटूर मार्केटीच्या निवडणुकीत १७ विरुद्ध २८ असा सामना रंगणार असून माजी मंत्री तथा.खा.गंगाधरराव देशमुख कुंटूरकर बरबड्याचे सेवा सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन आंबादासराव उफ धर्माधिकारी बरबड्याची माजी सरपंच बालाजी मदेवाड माजी प्रचार्य मनोहर पवार मनोज पाटील टाकळीकर यांच्या विशेष प्रयत्नातुन भाजपाचे १० दहा तर काँग्रेसचे ८ उमेदवार घेऊन युती करण्यात आली आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्या गटाकडून कुंटूरच्या मार्केट कमिटीच्या निवडणुकीत फॉर्म दाखल करण्यात आले होते परंतु काँग्रेसने ऐनवेळी धक्का दिल्यामुळे राष्ट्रवादीच्या वसंत पाटील सुगावे यांनी रिंगणात माघार घ्यावे लागले व सूर्यकांत पाटील कदम कुंटूरकर गट सुद्धा शेतकरी विकास पॅनल कडे अटॅज झाला आहे 
तालुक्यातील कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाचा काँग्रेस भाजपा कडून गेम करण्यात आला असल्याची चर्चा रंगत असली तरी कुंटूर मार्केट कमीटीवर सत्ता काबीज करण्यासाठी कुंटूरकराचा गड कायम व शाबूत ठेवण्यासाठी भाजपा आणि काँग्रेस पक्षाची युती झाली आणि रंणसिंग फुंकण्यात आले यात काँग्रेस व भाजपाचे मिळून १७ उमेदवाराच्या विरुद्धात इतर स्वतंत्र २८ उमेदवार रिंगण गाजवणार असले तरी भाजपाकडून शिंदे गटाचा पत्ता कट करण्यात आला आहे कुंटूर मार्केट कमीटीच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनल सदरचे आहेत आंबादासराव नरहरराव धर्माधिकारी रुपेश गंगाधरराव देशमुख मनोजकुमार रावसाहेब मोरे शिवाजीराव बळवंतराव धर्माधिकारी येसाजी देवराव कदम रेश्माजी दत्तराम जाधव हनुमंतराव ग्यानोबा पांडे सुवर्णा संभाजी जाधव प्रणिता आनंदराव हंबर्डे रमेश गंगाधर इबितवार गोविंद राजाराम परडे बालाजी देवराव कदम माधव वामनराव कदम दत्तात्रे पोचिराम आईलवार बालाजी गंगाधर लव्हाळे गोविंद दिंगाबर शेवाळे हे उमेदवार २८ विरुद्ध १७ रिंगणात आहेत 


Post a Comment

0 Comments