Header Ads Widget

सत्यशोधक महात्मा जोतीबा फुले यांची रुई बु येथे दलित बांधवाच्या वतीने जयंती साजरी !!

        माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे रुई बु येथे सत्यशोधक महात्मा जोतिबा फुले यांची दलित बांधावाच्या वतीने मोठया उत्साहात साजरी करण्यात आली असून यावेळी विशेष मान्य वरांच्या हस्ते म्हणजे माजी सरपंच भुजंगराव पाटील शिंदे यांच्या वतीने पुस्प अर्पण करण्यात आले आहेतालुक्यातील रुई बु येथील दलित बांधवाच्या वतीने समाज मंदिर येथे भव्य महात्मा फुले यांची जयंती साजरी करत असताना महिला वर्ग ही मोठया संख्येने उपस्थित होत्या सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे माजी सरपंच भुजंगराव पाटील शिंदे यांच्यासह तुकाराम मागीलवाड निवृत्ती दशरथा पाटील शिंदे माजी पोस्ट मास्तर किशनराव तुकाराम पवार माजी सरपंच रावसाहेब पवार राहुल वाघमारे रामचंद्र चंचलवाड यांच्यसह आदी मान्यवर उपस्थित होते
महात्मा जोतीबा फुले एप्रिल ११, इ.स. १८२७  नोव्हेंबर २८ इ.स. १८९० हे मराठी लेखक विचारवंत आणि समाज सुधारक होते त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली असून शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी महात्मा फुले यांनी केली आहे

दिनांक ११ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११ ते साडे आकारा वाजण्याच्या दरम्यान जयंती साजरी करण्यात आली यावेळी श्रीमती कौतिकाबाई जळबाजीराव सोनकांबळे श्रीमती गंगाबाई गोविंदराव वाघमारे उपस्थित होत्या 

महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात महात्मा जोतिबा फुले यांनी आणले आहे

Post a Comment

0 Comments