Header Ads Widget

आर्या ज्वेलर्स करखेली येथील व्यापाऱ्याचा पाठलाग चाकूचा धाक दाखवित जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी २४ तासाच्या आता केले जेरबंद - धर्माबाद पोलिसांची दमदार कामगिरी !!

              माधव पवार
धर्माबाद पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अभिषेक  शिंदे यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आर्य ज्वेलर्स करखेली येथील रहिवासी असलेल्या सोन्याच्या दुकानदारास दिनांक १० एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आर्या ज्वेलर्स करखेली येथील व्यापारी अजित वसंत माने वय ३०  वर्षे राहणार कारेगाव फाटा तालुका धर्माबाद हे नेहमी प्रमाणे सायंकाळी आपली दुकान बंद करून मोटर सायकलने घराकडे जात असताना अनोळखी आरोपीने लुटले होते

मौजे पिंपळगाव कॅनल जवळ अनोळखी चार चोरानी सदरच्या व्यापाऱ्याचा पाठलाग करून त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली आहे 

सदरच्या आरोपीनी  चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी केल्या प्रकरणी धर्माबाद पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अभिषेक  शिंदे यांनी सदरच्या आरोपीचा पथक तयार करून तातडीने  शोध घेतला व २४  तासाच्या आत सदरच्या आरोपीला गोळेगाव येथून जर बंद करण्यात आली असल्याची माहिती कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी नायगाव फास्ट न्यूजला दिली आहे

तालुक्यातील व धर्माबाद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या कारेगाव फाट्याकडे जात असताना सदरच्या चार आरोपींनी आर्य ज्वेलर्सच्या मालका कडून सोन्याचे चांदीचे व नगदी रुपयाचे बॅग चाकूचा धाक दाखवून जबरीने चोरून नेला वगैरे फिर्याद वरून  धर्माबाद पोलीस ठाण्यात गुरन ७२  / २०२३ कलम ३९४ - ३४   भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पथक तयार करून स्वतः पथकासह  निमटेक उमरी हा भाग पिंजून  काढला आहे

पोलीस निरीक्षक  शिंदे  यांना गोपनीय बातमीदार कडून मिळालेला माहिती नुसार सदर गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आरोपी हा गोळेगाव येथे असल्याचे खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी पथकासह जाऊन सदरच्या आरोपीस ताब्यात घेतले आरोपीला खाकी  दाखवताच  गुन्हा कबूल केला व सांगितले



Post a Comment

0 Comments