Header Ads Widget

नायगाव तालुक्यात जोरदार पाऊस " अन " मांजरम भागात गाराचा मारा चालूच !!


विशेष प्रतिनिधी :
बाळासाहेब पांडे :
- 

नायगाव तालुक्यात रवीवारी दुपारी दीडच्या च्या दरम्यान वातावरणात अचानक बद्दल होऊन आभाळ भरून आले.मांजरम भागात वादळी वाऱ्या सह गाराचा पाऊस झाला तर बाकी सगळीकडे  नायगाव  शहर व परिसरात विजेच्या कडकडाटात पावसाळ्या प्रमाणे पाऊस झाला या मुळे लग्नाची ची मोठी तारीख असल्याने वर्हाडी मंडळीसह सर्वांची तारांबळ उडाली आहे 
नायगाव च्या बाजार मध्ये सर्वत्र लग्न सराईची गडबड चालू असून सर्वत्र बाजार पेठेत वर्डळ चालू असल्याने अचानक आलेल्या पावसाने ग्राहक व्यापारी यांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली.रस्त्यावर उभे केलेले भाजीपाला,फळ विक्रेते,जनावरे,विविध प्रकारची दुकाने यांचे  नुकसान झाले आहे 
 नायगाव तालुक्यात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दररोज फटका बसत असून काही वेळा विजेच्या कडकडाटा सोबत वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस पडलाअसल्याने  उभे पिके आडवी झाली हाता तोंडाशी  आलेला घास हिरावून घेतला गेला आहे तालुक्यात मोठ्या प्रमाणात हळद उन्हाळी सोयाबीन उन्हाळी हायब्रीड ज्वारी टरबूज पपई कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान वरचे वर होत आहे.

तहसीलदार साहेब यांना शेतकरी पुत्र यांनी  तात्काळ तालुक्यातील सर्व तलाठी वर्गाना आदेश देऊन नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासाठी शासन दरबारी कळवावे अशी विनंती सोशियल मीडीया व निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. परंतु दररोज च पाऊस पडत असल्याने  नुकसानीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. 


.

Post a Comment

0 Comments