Header Ads Widget

मार्केट कमिटीच्या निवडणुकीत शासनाचा आडवा दांडू आल्याने निवडणुका थंडगार राजकीय पुढाऱ्यांच्या हालचाली बंद ? -

        माधव पवार 
नांदेड जिल्ह्यात मार्केट कमिटीच्या निवडणुका लागल्याच्या नंतर सरकारने त्या निवडणुकी मध्ये आडवा दांडू टाकल्यामुळे ग्रामीण भागात निवडणुकीच्या चर्चेला चांगली मरगळ आली चर्चा थंडगार असल्यामुळे राजकीय पुढारी सुद्धा निवडणुकीचा संदर्भात हालचाली करण्यासाठी धजावत नसल्याचे स्पष्ट चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे

सरकारने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा अशाच पद्धतीने रेंगाळून टाकले आहेत गेल्या एक ते दीड वर्षापासून जिल्हा परिषद सदस्यविना अनेक जिल्हा परिषदेचे गट वाऱ्यावर आहेत त्याच बरोबर संबंधित पंचायत समितीचे सभापती नसल्यामुळे सुद्धा सदरचे कार्यालय बंद आहेत या बाबतीत अनेक शेतकऱ्यांचे कामे खोंळबुन जात आहेत

सध्याच्या परिस्थितीत ग्रामीण भागात मार्केट कमिटीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या सदरच्या निवडणुका लढवण्यासाठी कार्यकर्ते व राजकीय पुढारी सज्जे झाले असतानाच प्रशासनाने त्या निवडणुकीवर आडवा दांडू टाकून आलेल्या रंगाला ढिसाळून टाकले असल्याचे चित्र चित्र पाहवयास मिळाले असले सदरचा टाकलेला आडवा दांडू कधी सरळ होणार असाही प्रश्न चर्चेला जात आहे 

Post a Comment

0 Comments