नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल घुंगराळा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वंजारवाडी येथील सन १९६० पासूनचे सर्वच मूळ रेकॉर्ड जाळण्या मागचे कारण काय ? यांचा सूत्रधार कोण असा ही प्रश्न केला जात असून सदरचे रेकॉर्ड अज्ञात आरोपीने जाळून टाकल्यामुळे शिक्षकासह विद्यार्थी व माजी विद्यार्थी चांगलेच हातबल झाल्याचे दिसून येत असून आता नवीन रेकॉर्ड करण्यासाठी प्रशासनाला व शिक्षकाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे
तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल घुंगराळा ही नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेली शाळा या शाळेतील सर्वच शाळेतील रेकॉर्ड सन १५ जून २०१६ रोजीच्या मध्यरात्री जाळून टाकल्यामुळे सर्वच पुरावे नष्ट झाले आहेत पण सहा वर्षांच्या नंतर म्हणजे सातव्या वर्षी वंजारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील कपाटात सुरक्षित ठेवलेले रेकॉर्ड अज्ञात आरोपीने जाळून खाक केल्यामुळे या ठिकाणचे ही सर्वच कागदपत्रे नष्ट झाले असल्याची माहिती येथील केंद्रप्रमुख उद्धवराव ढगे यांनी दिली आहेजिल्हा परिषद हायस्कूल घुंगराळा व वंजारवाडी येथील शाळेतील महत्त्वाचे कागदपत्रे व रेकॉर्ड जाळून अज्ञात आरोपीने हात साफ केले असले तरी त्यांचा शोध लागणे ही अतिशय महत्त्वाची बाब असून या दोन्ही शाळेतील अनेक महत्त्वाचे साहित्य शाळेत असताना सुद्धा ते घेऊन जाता शैक्षणिक बाब असलेले रेकॉर्ड जाळून शाळेतील सर्वच कागद पत्राचा पुर्वा नष्ट करण्याचे काम आज्ञात आरोपी कडून करण्यात असून या मागचा सूत्रधार कोण असा ही प्रश्न चर्चेला जात आहे

0 Comments