नायगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय बेंद्री येथे नांदेड जिल्ह्याचे भाजपाचे खासदार विद्यमान प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल योजनेच्या उद्घाटन सोहळ्याचे निमित्ताने ग्रामसेवक संघटनेचे नायगाव तालुका अध्यक्ष टी जी रातोळीकर यांच्यासह विद्यमान सरपंच सचिन पाटील बेंद्रीकर व उपसरपंच याच बरोबर स्वागत गावकऱ्यांनी विद्यमान चिखलीकर यांचे गळ्यात खोबऱ्यांचा हार घालून जंगी स्वागत केले आहे
नायगाव तालुक्यात अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयांच्या वतीने शासनाकडून जल जीवन मिशन योजने अंतर्गत लाखो रुपयांचे उद्घाटन करण्यात येत असले तरी बेंद्री ग्रामपंचायत कार्यालय सुद्धा या योजनेचा नितीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे
नांदेड जिल्ह्याचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या शुभहस्ते सदरच्या कामाचा नारळ फुटला असून सदरचे काम जलद गतीने चालू करण्यात यावे असा सर्वांचा मानस आहे तालुक्यातील बेंद्री ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक व गावचे विद्यमान सरपंच सचिन पाटील बेंद्रीकर यांनी गावच्या विकासाला गती मिळावी म्हणून खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विशेष उपस्थितीत सदरच्या उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे
यावेळी गावातील सर्व ग्रामपंचायतचे सदस्य व जेष्ठ प्रतिष्ठित नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता ग्रामपंचायत कार्यालय बेंद्री येथे जल जीवन मिशन अंतर्गत हरघर जल योजनेच्या उद्घाटन सोहळा प्रसंगी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे टि जी रातोळीकर यांच्यासह गावकऱ्यानी खोबऱ्याचा हार घालून सत्कार केला आहे
सदरील कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ग्रामसेवक संघटनेचे नायगाव तालुका अध्यक्ष टि.जी रातोळीकर यांनी नायगाव फास्ट न्यूशी बोलताना सांगितले आहे

0 Comments