Header Ads Widget

जीवाला जीवाच दान माझ्या भिमान केल महामानवाची पळसपुर जंयती उत्साहात साजरी !!


हिमायतनगर : नागोराव शिंदे - 

हिमायतनगर तालुक्यासह ग्रामीण भागात असलेल्या मौजे पळसपूर येथे दिनांक १४ एप्रिल २०२३ रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ व्या जयंती सोहळा मोठ्या थाटात साजरा होत असल्याची माहिती आमचे नायगाव फास्ट न्यूजचे हिमायतनगरचे प्रतिनिधी नागोराव शिंदे यांनी दिली आहे
तालुक्यातील मोजे पळसपुर येथे सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन महामानव प्रज्ञा सूर्य विश्ववंदनीय महाकारूणी तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून भारतीय राज्यघटनाकारांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना सदरच्या जयंती सोहळ्यात बाबासाहेब आंबेडकरांचे गीत सादर करण्यात आले यात जीवाला जीवाचे दान माझ्या भिमान केल असे रेकॉर्ड लावून महामानवाची जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही केवळ व्यक्ती नसून तो विचार आहे. हा विचार प्रेरणादायी आणि प्रवाही आहे. त्यांचे जीवन आणि कार्य हे तळागाळातील हजारो वर्षांच्या सामाजिक अन्याय आणि आर्थिक शोषणामुळे भरडलेल्या लोकांकरिता प्रेरणा आहे

ही प्रेरणा केवळ वैचारिक पातळीपुरती मर्यादित नाही, तर झोपलेल्या समाजाला जागृत करून त्यांच्यात स्वाभिमान, अस्मिता आणि आर्थिक सबळता निर्माण करण्याचा कृती कार्यक्रम आहे. जाज्वल्य-राष्ट्रनिष्ठा आणि देशप्रेम हे बाबासाहेबांच्या जीवन आणि कार्याचे अतूट अंग असल्यामुळे सर्व समाज बांधव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्यात सहभागी झाल्याचे व्रत आहे 

Post a Comment

0 Comments