भारत देशाला संविधानांच्या माध्यमातून लोकशाही मिळवून देणाऱ्या विश्ववंदनीय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने नायगाव बाजार येथील भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व तथा सामाजिक कार्यकर्ते युवकांची बुलंद तोफ गजानन पाटील चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयात महामानवांची जयंती मोठ्या थाटात साजरी झाली असल्याचे गजानन पाटील चव्हाण यांनी सांगितले आहे
नायगाव शहर येथे भारतीय जनता पार्टीची युवा नेतृत्व गजानन शंकरराव पाटील चव्हाण यांच्या जन संपर्क कार्यालय येथे तालुक्यातील सामाजिक,राजकीय, व विविध क्षेत्रातील सर्व पदाधिकारी यांच्या विशेष उपस्थितीत महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पंचशील व त्रिशरण घेण्यात आले या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने अनेक मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे मनोगत व्यक्त केले आहे या जयंतीस प्रमुख उपस्थित ज्येष्ठ मार्गदर्शक भाऊराव पाटील चव्हाण, माधव पाटील गंगनबिडकर, चंद्रकांत पाटील पवार कैलास भाऊ भालेराव विठ्ठल पाटील गवळी रामदास पाटील भाकरे गंगाधर कोतेवार गजानन पाटील तंमलुरे हनुमंत चंदनकर शिवाजी पाटील जाधव सातेगावकर आकाश पाटील पवार विठ्ठल वाघमारे बोरीकर या सह मोठ्या संख्येने उपस्थित होते
भारतीय संविधानांच्या माध्यमातून देशाला लोकशाही मिळवून देणाऱ्या विश्ववंदनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती युवा नेतृत्व गजानन पाटील चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली आहे

0 Comments