नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोरगरीब लाभार्थाना १०० रुपयात आनंदाचा शिधा मिळावा म्हणून सदरची महत्वकांक्षी योजना काढली असल्यामुळे या योजनेचा शहरी भागासह ग्रामीण भागातील लाभार्था पर्यंत मिळाला पाहिजे या डोळस विचाराने सदरची योजना काढण्यात आली या योजनेतील आनंदाचा शिधा बाळासाहेब उर्फ आंबादासराव धर्माधिकारी बरबडेकर यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले आहे
तालुक्यातील बरबडा येथील स्वस्त धान्य दुकानावर भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तथा भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने शासनाचा आनंदाचा शिधा वाटप करण्यात आले यावेळी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन आंबादासराव उर्फ बाळासाहेब धर्माधिकारी बरबडेकर यांच्या विशेष उपस्थितीत वाटप करण्यात आले शासनाने नूतन वर्ष म्हणजे गुडी पाडव्याच्या दिवशीच वाटप करण्याचे आदेश काढले होते
नायगाव तहसीलदार प्रभारी तहसीलदार निळे यांच्या आदेशानुसार गेल्या आठवड्यातच शासकीय गोडाऊन मधून आनंदाचा शिधा वाटप करण्याचे आदेश काढले असल्यामुळे गोडाऊन किपर शेख युनूस यांच्या माध्यमातून अनेक स्वस्त धान्य दुकानदाराला आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला तो आनंदाचा शिधा वंदनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने वाटप करण्यात येत असून तालुक्यातील खेड्या पाड्यात सदरच्या योजनेचा लाभ लाभार्थी घेत आहेत

0 Comments