Header Ads Widget

नवरी नवरदेवाला घेऊन जाणारी ईरटीका गाडी रसवंती गृहामध्ये घुसली ; पाच ते सात जण जखमी तामसा रस्त्या वरील घटना !!


माधव पवार / गजानन जिदेवार - 

नवरी नवरदेवाला घेऊन जाणारी ईरटीका गाडीने उभ्या असलेल्या स्विफ्ट डिझायर गाडीला जोराची धडक देऊन रसवंती गृहामध्ये घुसल्याची घटना  दिनांक २५ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान हदगाव ते तामसा रस्त्यावर घडली. या अपघातात गाडीतील पाच ते सात जण जखमी झाल्याचे समजते.
तालुक्यातील तामसा ते तळेगांव फाटा दरम्यान दिनेश पवार यांचे रसवंतीगृह आहे.त्यांचे मावस काका यांनी शिफ्ट डिझायर गाडी रसवंती गृहाच्या बाजूला उभी  केली होती
                  
तामसाकडून हदगावकडे जाणारी एम एच ०२ डी.डबल्यू ८१५७ ह्या नंबरची ईरटीका गाडीच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ईरटीका गाडीने उभ्या असलेल्या स्विफ्ट डिझायर गाडीला जोराची धडक  देऊन वीस ते पंचवीस फूट घासत दोन्ही गाड्या रसवंती गृहात घुसल्यामुळे सदरचा अपघात तामसा रस्त्यावर असलेल्या रसवंदीच्या फाटकात कार घुसून अपघात झाला आहे 
अपघातात गाडीतील पाच ते सात जण जखमी झाले आहेत.जखमींमध्ये नवरी नवरदेव ड्रायव्हर दोन महिला व दोन लहान बालकांचा समावेश  असल्याचे सांगितल्या जात आहे. तर रसवंती गृहात बसलेल्या कोणत्याही नागरिकांना दुखापत झाली नसल्याचे समजते

जखमींना उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे.या अपघातामुळे रसवंतीगृहातील मशीन फ्रिज लाकडी सामान व बाजूला असलेल्या पान टपरीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

Post a Comment

0 Comments