भाजपाच्या राजवटीत गेल्या सात ते आठ वर्षा पासून राज्यातील राज्य सरकारने गोरगरीब रोजगाराना रोजगार मिळवून देण्यासाठी कसल्याच प्रकारचे कामे चालू करण्यात आले नसल्यामुळे रोजगारावर उपवास मारीची वेळ आली असताना सुद्धा सरकार गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब मजूर बाहेर राज्यात पोटाची खाळगी भरण्यासाठी जात आहेत
राज्यात निवडणुका लागण्याची चाहूल लागत असल्याचे लक्षात घेऊन सरकार कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नावीन्यता विभाग महाराष्ट्र अंतर्गत पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करीत असतात तशाच पद्धतीने दिनांक २७ एप्रिल २०२३ रोजी ना. मंगल प्रभात लोढा मंत्री कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता या अंतर्गत खरच नौकरीची संधी आणि रोजगाराची हमी मिळणार का ? असा प्रश्न चर्चेला जात आहे
नायगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पवार यांच्या नेतृत्वाखाली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नायगाव तालुका नांदेड येथे दिनांक २७ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे
गेल्या अनेक वर्षा पासून रोजगाराना काम मिळाले नाही नौकरीची संधी मिळाली नाही कृष्णूर अद्योगिक वसाहतीत ग्रामीण भागातील सुशिक्षित बेकार मुलांना नौकऱ्या नाहीत शासकीय नौकऱ्या शासन देत नाही या आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यातुन काय साध्य होणार या कडे सर्वाचे लक्ष लागले आहे

0 Comments