Header Ads Widget

कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणुकीत धन शक्तीच्या लढतीत दोन पत्रकारांची लढत - नो समेंट

       माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली असून या सदरच्या निवडणुकीमध्ये लोकशाही मार्गाने कुंटूर येथील रहिवासी असलेले दोन पत्रकारांनी धन दांडग्याच्या लढतीत आपली अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे

कुंटूर मार्केट कमिटीची निवडणूक अपक्ष उमेदवारी दाखल करून निवडणूक लढवीत असल्यामुळे सदरची ही निवडणूक अटी तटीची होत नसली नुवडणुकीतील पैलवानाला बसला इनाम अर्थात बिनविरोध निघू नये म्हणून आपली अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे

खऱ्या अर्थाने ही लोकशाहीतील एक प्रकारची स्पर्धाच असल्याने या निवडणुकीत विजय अथवा पराजय झाला तरी चालेल परंतु निवडणूक लढविण्याचा चक्क हट्टच दोन पत्रकारानी धरला आहे

तालुक्यातील कुंटूर मार्केट कमिटीचे नेतृत्व करण्यासाठी व विजय प्राप्त करून घेण्यासाठी मोठ मोठाले शक्तिशाली नेते मंडळीनी निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे

भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे लोकशाहीच्या मार्गाने कुंटूर मार्केट कमिटीची निवडणूक लढविण्याची मालू चंदर कांबळे शंकर केरबा आडकिने यांनी या निवडणुकीत आपली अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे

निवडणुकीच्या रणात रणधुमाळी खेळण्यासाठी तयार झालो असल्याचे ही या दोन्ही पत्रकारांनी सांगितले असून कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणुकीत शक्तीशाली लोकांची एका बाजूने फळी हुभी असली तरी सदरच्या निवडणुकीत या दोन पत्रकारांनी " नो समेंट " केले आहे 

Post a Comment

0 Comments