नुकत्याच बिनविरोध पार पडलेल्या सेवा सहकारी सोसायटी मांजरम निवडणुकीतील चेअरमन पदी शिवसेना कार्यकर्ते तथा माजी प.स.सदस्य शिवाजी नागोराव गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून या निवडी बद्दल सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी ए बी राठोड सहकार श्रेणी ( १ ) यांच्या अध्यक्षते खाली गुरुवारी सकाळी १० वाजता सेवा सहकारी सोसायटीच्या सभागृहात बैठक घेण्यात आली या बैठकीत चेअरमन पदा साठी एकमेव शिवाजी गायकवाड यांचाच अर्ज आल्याने त्यांची सर्वानुमते अविरोध चेअरमन पदी निवड करण्यात आली आहे
या वेळी सर्वश्री संचालक शिवाजी शंकरराव शिंदे,प्रल्हाद तेजेराव शिंदे, राजेश आनंदराव शिंदे, व्यंकटराव बापूराव जाधव, वसंतराव आबाजी जाधव,प्रकाश अमृता मालिपाटील, श्रीकांत दिगांबरराव शिंदे,सौ. सुवर्णमाला श्रीपत शिंदे गोदावरी व्यंकटराव शिंदे अर्जुन राजाराम मलदोडे,गोविंद नागोराव छपरे, यांची उपस्थिती होती.
नवनिर्वाचित चेअरमन शिवाजी गायकवाड व सर्व संचालक यांचा मनोज शिंदे मांजरमकर यांच्या वतीने सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत

0 Comments