नायगाव तालुक्यातील ग्रामपंचायत बेंद्री येथे जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल योजनेचा भूमिपूजन शुभारंभ कार्यक्रम व नांदेड जिल्ह्याचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा भव्य नागरी सत्कार कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती बेंद्री नगरीचे सरपंच सचिन पाटील बेंद्रीकर यांनी दिली आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा बेंद्री नगरीचे सरपंच युवा नेते सचिन पाटील बेंद्रीकर यांच्या पुढाकारातून बेंद्री गावाच्या महत्त्वपूर्ण पाणी प्रश्न सोडण्याच्या उदात्त दृष्टिकोनातून या 'हर घर जल ' या महत्वपूर्ण योजनेचा भूमिपूजन शुभारंभ व मा. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा भव्य नागरी सत्कार सोहोळ्याचे आयोजन करण्यात आले आहे
सदरील कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १५ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता करण्यात आले असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राम पाटील रातोळीकर, भाजप जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, राजेश देशमुख कुंटूरकर, प्रणिता ताई देवरे, प्रविण पाटील चिखलीकर, श्रावण पाटील भिलवंडे, बालाजी बच्चेवार, आशोक पाटील मुगावकर, माणिकराव पाटील शिंदे माणिक लोहगावे, कोंडीबा पाटील शिंदे, शंकर पाटील कल्याण देविदासराव बोंमनाळे, दिलीपराव धर्माधिकारी,भगवानराव लंगडापुरे आदीसह उपस्थित राहणार आहेत
प्रविण बियाणी, प्रविण बियाणी, उमाकांत राव देशपांडे, विनायकराव पाटील शिंदे, प्रभावती कत्ते, पांडुरंग पाटील शिंदे, गजानन पाटील चव्हाण, व्यंकटराव पाटील चव्हाण, धनराज शिरोळे, भाऊ पाटील चव्हाण, गंगाधर पाटील कल्याण, कुमुद पटेल, शिवा गडगेकर, माधव पाटील कल्याण, डॉ .जिवन चव्हाण, चंदू पाटील चव्हाण, नागेश पाटील कल्याण, राजू अप्पा बेळगे, एजाज सय्यद , आदींसह अनेकांची उपस्थिती कार्यक्रम सोहोळ्यात राहणार आहे. तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान बेंद्री ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सचिन पाटील बेंद्रीकर यांनी केले आहे.

0 Comments