Header Ads Widget

नायगाव मार्केट कमिटीच्या निवडणुकीत काँग्रेसचे १२ तर भाजपाचे ६ संचालक बिनविरोध - कुंटूर येथे ४५ उमेदवार रिंगणात -

              माधव पवार
नायगाव मार्केट कमिटीच्या निवडणुकीत काँग्रेसचे १२ तर भाजपाचे ६ संचालक बिनविरोध तालुक्यातील कुंटूर येथे ४५ उमेदवार रिंगणात असल्यामुळे येथे चांगली विजय मिळवून घेण्यासाठी बड्या नेत्यांना कसरत करावी लागणार असल्यामुळे सत्ता संघर्ष आता संघर्षातुन निर्माण होणार असली तरी येथे शिंदे गटाचे उमेदवार गंगाधर बडूरे यांनी भाजपा युवतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे 
नायागांव बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस व भाजपा पक्षाचे नेते मंडळी आप आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते परंतु " आगे सोच " असा विचार करून जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर व नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान माजी आमदार वसंतराव चव्हाण माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी यांच्या प्रयत्नामुळे भाजपा यश मिळाले आहे 

अखेरच्या दिवशी म्हणजे दिनांक २० एप्रिल २०२३ रोजी झालेल्या काँग्रेस व भाजपाच्या तडजोडी नंतर काँग्रेसचे १२ तर होटाळकर गटाचे ६ संचालक बिनविरोध निवडून आले असल्यामुळे सत्तेसाठी राजकीय नेते मंडळी मित्र पक्ष बाजूला गेला तरी चालेल परंतु विरोधी पक्ष जवळ आला पाहिजे या हेतूने नायगाव मार्केट कमीटीच्या निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेस एकत्र सत्ता स्थापन करणार आहेत

नायगाव तालुक्यातील कुंटूरची मार्केट कमिटी बड्या नेत्यांना विनविरोध का ? काढता आली नाही - 

नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या भाजपाचे राजेश देशमुख कुंटूरकर यांना मात्र कुंटूरची मार्केट कमिटी बिनविरोध काढण्यासाठी यश मिळाले नाही या निवडणुकीकडे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी लक्ष दिले असते तर सदरची निवडणूक बिनविरोध निघाली असती असा प्रश्न चर्चेला जात असला तरी कुंटूरच्या मार्केट कमीटीच्या निवडणुकीत तब्बल ४५ उमेदवार रिंगणात आहेत 










Post a Comment

0 Comments