नायगाव तालुक्यातील मौजे टाकळी ( त ब ) येथील रहिवासी असलेले शेतकरी तुकाराम मारोती मोरे यांच्या गट क्रमांक ९६ मध्ये दिनांक १४ एप्रिल २०२३ रोजी मध्यरात्री आकाशात अचानक बिघाड होऊन विजे कडकडाट वादळी पाऊस पडला आहे
या पावसात आकाशातील वीज जागलीवर बांधून ठेवलेल्या बैलावर पडली असल्यामुळे सदर बैल ठार झाल्याची घटना घडली असून या घटनेत शेतकऱ्यांचे ६० हाजर रुपयाचे नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे
तालुक्यातील मौजे टाकळी ( त.ब ) येथील शेतकऱ्यांनी सदरच्या बैलाना जागलीवर बांधून घरी आले होते शेतकरी तुकाराम मारोती मोरे यांनी दिनांक १५ एप्रिल २०२३ रोजी दुपारी शेतकऱ्याना ही बाब लक्षात आली आहे
या संदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याना या बाबीची देण्याचा प्रयत्न केला परंतु वातावरणात बिघाड असल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही सदरच्या प्रशासनाने सदरील घटनेचा पंचनामा करून शेतकरी तुकाराम मारोती मोरे यांना तात्काळ आर्थिक मदत मिळवून द्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

0 Comments