Header Ads Widget

कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणुकीत काँग्रेस भाजपा एकत्र लढविणार - इतर उमेदवार स्वतंत्र रण मैदानी यांना टक्कर देणार - काँग्रेसने दगा दिला - राष्ट्रवादी -

       माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणुकीकडे तालुक्यासह जिल्ह्यचे लक्ष लागून असल्यामुळे या निवडणूकीत काँग्रेस पक्षाची आणि भाजपा पक्षानी एकत्र निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली असली तरी त्यांना टक्कर देण्यासाठी इतर उमेदवार रिंगणात उत्तरले आहेकाँग्रेस आणि भाजपाला चांगलीच कसरत करावी लागणार असल्यामुळे एकूण १८ जागा यातील कुंटूरकर गटाचा संचालक अगोदरच बिनविरोध निघाला आला असून १७ जागेसाठी निवडणूक होणार असल्यामुळे सदरच्या उमेदवारानी मतदाराच्या भेटी घाटी घेण्यासाठी सज्ज झाले असल्याचे चित्र दिसून येत आहेराष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्या ही गटानी उमेदवारी दाखल केली होती परंतु मित्र पक्ष असलेला काँग्रेस पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेसला धोका दिला असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे

शिंदे गटाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख गंगाधर बडूरे यांच्या गटांनी सुद्धा उमेदवारी दाखल केली होती परंतु युती गटा कडून सहकार्य मिळाले नसल्यामुळे माघार घेतले असल्याचे त्यानी सांगितले असले तरी आंबादासराव उर्फ बाळासाहेब धर्माधिकारी बरबडेकर यांनी महत्वाची भूमिका बजावणार आहेत
तालुक्यातील कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणूकीच्या रिंगणात एकूण ४५ उमेदवार असल्यामुळे  भाजपाचे राजेश देशमुख कुंटूरकर गट आणि काँग्रेसचे माजी सरपंच बालाजी मदेवाड गट एकत्र येऊन सदरची मार्केट कमीटीची जागा शर्थीने लढविणार आहेत अशी माहिती मिळत असून सूर्यकांत पाटील कदम यांच्या वाट्याला तडजोडी नंतर एक जागा आल्यामुळे काँग्रेस गटाशी अटॅचमेंट झाले असल्याचे सांगण्यात आले आहे

कुंटूर मार्केट कमिटीच्या निवडणुकीत एकूण ४५ उमेदवार रिंगणात आहेत भाजपा पक्षाचे ९ तर काँग्रेस पक्षाचे ८ आणि इतर स्वतंत्र फॉर्म दाखल केलेले काँग्रेसचे असो की भाजपाचे असो असे एकूण २८ जण रिंगणात आहेत तर सदरच्या निवडणुकीत १७ विरोध २८ असा सामना होणार असल्याचे वास्तव चित्र सदरच्या निवडणुकीत दिसून येणार आहे 

Post a Comment

0 Comments